सप्तशृंगगडावर मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:31 IST2019-10-05T00:30:42+5:302019-10-05T00:31:02+5:30

ऐन नवरात्रोत्सवात सप्तशृंग गडावर शुक्रवारी जोरदार पाऊस झाल्याने भाविकांचे प्रचंड हाल झाले, तर व्यावसायिकांचीही तारांबळ उडाली. नवरात्रोत्सवातील सहावी माळ असून, शुक्रवारी देवीचा वार असल्याने गडावर सुमारे ५० हजार भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली.

A rainbow on the seven horns | सप्तशृंगगडावर मुसळधार

सप्तशृंगगडावर झालेल्या मुसळधार पावसाने भाविकांची उडालेली तारांबळ.

ठळक मुद्देनवरात्रोत्सवात भाविकांचे हाल

वणी : ऐन नवरात्रोत्सवात सप्तशृंग गडावर शुक्रवारी जोरदार पाऊस झाल्याने भाविकांचे प्रचंड हाल झाले, तर व्यावसायिकांचीही तारांबळ उडाली.
नवरात्रोत्सवातील सहावी माळ असून, शुक्रवारी देवीचा वार असल्याने गडावर सुमारे ५० हजार भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. सकाळपासून वातावरण स्वच्छ व आकाश निरभ्र होते. दर्शनासाठी बाऱ्याही लागल्या होत्या. रोप वे केंद्रातही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. ट्रॉलीमध्ये बसण्यासाठी प्रतीक्षा भाविक करीत होते. दरम्यान, दुपारी १ वाजेच्या सुमारास गडावर जोरदार पावसास प्रारंभ झाला. दोन तासांपेक्षा अधिक काळ पाऊस कोसळत होता. अनपेक्षितपणे
वरुणराजाने हजेरी लावल्याने भाविकांनी पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी प्रसादाची दुकाने, हॉटेल्स, रस्त्याच्या कडेला तर काहींनी घरांचा आसरा घेतला.
पाऊस सुरू असताना राममंदिरापर्यंत बाºया लागलेल्या होत्या. दरम्यान, गडावर धोंड्या-कोंड्याच्या विहिरीजवळ तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. मंदिर परिसरापासून हे अंतर एक किलोमीटरच्या पुढे आहे. या अंतरात निवाराशेडची व्यवस्था असणे गरजेचे आहे. कारण ऐनवेळी येणाºया पावसाचा फटका भाविकांना बसतो. एक किलोमीटर अंतर पायी
येणारे अनेक भाविक ओलेचिंब झाले तर रस्त्यालगत विविध दुकाने लावणाºया दुकानदारांनाही याचा फटका बसला.
दरम्यान, ग्रामपालिकेच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांचा निवाराशेडसाठीचा विविध ठिकाणांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती उपसरपंच राजेश गवळी यांनी दिली. नवरात्र कालावधीत मागील वर्षापेक्षा यावर्षी भाविकांची हजेरी कमी आहे. त्यात पावसाच्या हजेरीमुळे गुंतवणूक करणारे व्यावसायिक धास्तावले आहेत.

Web Title: A rainbow on the seven horns