पावसामुळे ‘गारवा’ वाढला
By Admin | Updated: August 6, 2015 00:27 IST2015-08-06T00:26:52+5:302015-08-06T00:27:34+5:30
पावसामुळे ‘गारवा’ वाढला

पावसामुळे ‘गारवा’ वाढला
पंचवटी : शहर व परिसरात गेल्या दोन- तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दिवसभर हवेत गारवा निर्माण झाला आहे. गारव्यापासून बचाव करण्यासासाठी नागरिकांना दिवसादेखील घराच्या खिडक्या व दरवाजे बंद करावे लागत आहे.
पाऊस सुरू असलेल्या मोकळ्या भूखंडावर तसेच मैदानावर पावसाचे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. कधी सकाळी तर कधी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. दिवसभर वातावरणात गारवा राहत असल्याने पालक लहान मुलांना स्वेटर्स तसेच कानटोप्या परिधान करून त्यांचे गारव्यापासून रक्षण करीत आहेत. एकीकडे पावसाच्या सरी तर दुसरीकडे गारवा जाणवत असल्याने नागरिकांना पावसाळ्यात थंडीचा अनुभव येत आहे. वातावरणात गारवा वाढल्याने लहान मुलांना थंडी तसेच तापाची लागण होत असल्याने परिसरातील रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी होत असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)