Railway was broken near Ghati, a major accident was avoided due to staff vigilance | घोटीजवळ रेल्वे रूळ तुटला, कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे टळला मोठा अपघात
घोटीजवळ रेल्वे रूळ तुटला, कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे टळला मोठा अपघात

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरातील रामरावनगर भागातून मुंबईकडे जाणाºया रेल्वे रु ळाचा तुकडा तुटल्याची घटना घडली. मंगळवारी साडेनऊच्या दरम्यान या भागातून कर्तव्यावर असणाºया रेल्वे कामगारांच्या ध्यानात ही घटना आली. त्यांनी तातडीने सतर्कता राखून वरिष्ठांना या प्रकरणी माहिती दिली. ९ वाजून ४५ मिनिटांनी जाणारी सेवाग्राम एक्सप्रेस यामुळे रोखण्यात आली. रेल्वे रूळ तुटल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. कर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात होण्यापासून बचाव झाला. दरम्यान तुटलेल्या रु ळाला तात्पुरते जोडले गेले असून ह्यामुळे गाड्यांना संथ वेगाने दहा मिनिटे उशीराने धावत आहेत. घोटी परिसरातील रामराव नगर भागातून मध्य रेल्वेचे रूळ गेले आहेत. रेल्वेचे कर्मचारी भूषण गुप्ता, राजेंद्र गोडे, विजयकुमार सूर्यवंशी, अर्जुन सानप हे साडेनऊच्या दरम्यान या भागातून जात असतांना मुंबईकडे जाणाºया रु ळावर मोठा तुकडा पडून तुटला असल्याचे त्यांना समजले. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकार्यांना माहिती दिली. त्यानुसार ९. ४५ वाजता येथून जाणारी सेवाग्राम एक्सप्रेस आधीच्या स्टेशनला थांबवण्यात आली. या घटनेमुळे या गाडीचा संभाव्य अपघात सुदैवाने टळला. वरिष्ठांच्या सूचनेनुसार तुटलेल्या रु ळाला तात्पुरते जोडण्यात आले. गाड्या आता दहा मिनिट उशिराने संथ धावत आहेत. दुपारपर्यंत रु ळावर भक्कम काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Railway was broken near Ghati, a major accident was avoided due to staff vigilance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.