रेल्वेमंत्री पियुष गोयल सहकुटुंब नाशकात; मातोश्री चंद्रकांता यांंच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 03:06 PM2020-06-08T15:06:56+5:302020-06-08T15:10:42+5:30

केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सोमवारी (दि.८) सहकुटुंब नाशिकमध्ये येऊन त्यांच्या मातोश्री  माजी आमदार चंद्रकांता गोयल यांच्या अस्थिंचे रामकु डात विसर्जन केले. दोन दिवसांपूर्वी  पियुष गोयल यांच्या मातोश्री व माटुंगा विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे निधन झाले होते.

Railway Minister Piyush Goyal with family in Nashik; Immersion of the bones of Matoshri Chandrakanta in Ramkunda | रेल्वेमंत्री पियुष गोयल सहकुटुंब नाशकात; मातोश्री चंद्रकांता यांंच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

रेल्वेमंत्री पियुष गोयल सहकुटुंब नाशकात; मातोश्री चंद्रकांता यांंच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

googlenewsNext
ठळक मुद्दे चंद्रकांता गोयल यांच्या अस्थि रामकुंडात विसर्जितपियुष गोयल यांनी विधीवत पूजा करून केले विसर्जन

नाशिक : केंद्रीय रेल्वे, वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सोमवारी (दि.८) सहकुटुंब नाशिकमध्ये येऊन त्यांच्या मातोश्री  माजी आमदार चंद्रकांता गोयल यांच्या अस्थिंचे रामकु डात विसर्जन केले. यावेळी भाजपनेते गिरीश महाजन यांचीही उपस्थिती होती
दोन दिवसांपूर्वी  पियुष गोयल यांच्या मातोश्री व माटुंगा विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे निधन झाले होते. त्यांच्या अस्थिंचे विसर्जन करण्यासाठी सोमवारी सकाळी ते नाशिकमध्ये आले होते. त्यांनी गोदातीरी रामकुंडावर विधिवत पूजन करुन अस्थींचे विसर्जन केले.  गोयल यांच्या मातोश्री चंद्रकांता गोयल या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या होत्या. त्या मांटुगा विधानसभा क्षेत्रातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.  चंद्र्रकांता गोयल यांच्या निधनाची बातमी गोयल यांनीच ट्विटरदवारे दिली होती. त्यानंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन गोदातीरी रामकुंडावर करण्यासाठी पियुष गोयल कुटुंबियांसह सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास नाशिकमधील शासकीय विश्रामगृह येथे आले होते. त्यानंतर ते शिवनेरी ईमारत येथे गिरणा/गोदावरी सुट येथे थांबले. याठिकाणी त्यांच्या भेटीसाठी माजी जलसंपदा मंत्रीगिरीश महाजन हे देखील दाखल झाले होते. गोयल यांनी थोड्याच वेळात पंचवटीतील रामकुंड येथे जाऊन त्यांच्या मातोश्रींच्या अस्थी विधिवत पूजा करुन रामकुंडात  विसर्जित केल्या. त्यानंतर पुन्हा त्यानी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.  
 

Web Title: Railway Minister Piyush Goyal with family in Nashik; Immersion of the bones of Matoshri Chandrakanta in Ramkunda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.