नाशिक : पोलीस आयुक्तालयातील भद्रकाली, म्हसरूळ व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी करून आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे़ या जुगाºयांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.बागवानपुºयातील कादरी मशीदजवळील मोकळ्या जागेत मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून कल्याण मटका खेळणारे संशयित सय्यद मुश्ताक अब्दुल रज्जाक ऊर्फ बबलू पटेल (रा. कादरी मस्जिदीशेजारी, बागवानपुरा) यास ताब्यात घेतले़म्हसरूळ गावातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून संशयित सचिन बबन राक्षे (वय २८, रा. वडनगर, म्हसरूळ, नाशिक) व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले़ पत्र्याच्या शेडमध्ये हे तिघे कल्याण ओपन हा जुगार खेळत होते़ या तिघांकडून जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
शहरातील जुगार अड्ड्यांवर छापेमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:17 IST