नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी राधाकृष्ण गमे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:52 IST2020-09-01T01:52:19+5:302020-09-01T01:52:49+5:30

महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर नियुक्तीच्या प्रतीक्षाधीन असलेल्या राधाकृष्ण गमे यांना नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी शासनाने नियुक्त केले आहे. सोमवारी (दि.३१) विभागीय आयुक्त राजाराम माने निवृत्त झाले आणि त्यानंतर लगेचच गमे यांची नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले.

Radhakrishna Gamay as Nashik Divisional Commissioner | नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी राधाकृष्ण गमे

नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी राधाकृष्ण गमे

ठळक मुद्देमाने निवृत्त : मांढरे यांच्या हस्ते सेवापूर्तीनिमित्ताने गौरव 

नाशिक : महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर नियुक्तीच्या प्रतीक्षाधीन असलेल्या राधाकृष्ण गमे यांना नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी शासनाने नियुक्त केले आहे. सोमवारी (दि.३१) विभागीय आयुक्त राजाराम माने निवृत्त झाले आणि त्यानंतर लगेचच गमे यांची नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले. गमे यांची नियुक्ती होऊन दोन वर्षेही पूर्ण झाले नव्हते. तोच त्यांची बदली करण्यात आली आणि कैलास जाधव यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
४ तब्बल ३५ वर्षांच्या शासकीय
सेवेनंतर राजाराम माने हे नियत वयोमानामुळे निवृत्त झाले. सेवापूर्तीबद्दल त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते करण्यात आला. नियोजन भवनात झालेल्या कार्यक्रमास रंजना माने, उपआयुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, नाशिकचे अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, अपर जिल्हाधिकारी धनंजय गमे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Radhakrishna Gamay as Nashik Divisional Commissioner