शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शेतक-यांच्या प्रश्नांसाठी पेठ येथे रास्ता रोको, माकपा, राष्ट्रवादीसह काँग्रेस, मनसेचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 10:25 PM

कर्जमाफीत शेतकऱ्याची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करीत माकपाने राष्ट्रवादी, मनसे व काँग्रेसला सोबत घेत नाशिक-बलसाड रस्त्यावर पेठ चौफुलीवर जवळपास  रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.

पेठ (नाशिक)- तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांचे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने तसेच कर्जमाफीत शेतकऱ्याची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करीत माकपाने राष्ट्रवादी, मनसे व काँग्रेसला सोबत घेत नाशिक-बलसाड रस्त्यावर पेठ चौफुलीवर जवळपास  रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.माकपाचे आमदार जे.पी. गावीत, राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी मागील आठवडयात मोर्चा काढण्यात आला होता. मात्र शासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता. निराधार योजनेचा लाभ मिळावा, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, वनजमिनीचा प्रश्न मार्गी लागावा, घरकूल योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करावी, नदीजोड प्रकल्प तात्काळ थांबवा, पर्यटन विकास करावा, भारनियमन रद्द करावे, शासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करावी आदी मागण्यासाठी माकपा, किसानसभा, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांनी पेठ शहरातून मोर्चा काढत जुना बस स्टँडवर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.जवळपास दहा तासांपासून सुरू असलेल्या रास्ता रोकोत आंदोलकांनी सोबत भाकरी बांधून आणल्या असून रात्रीच्या मुक्कामाच्या तयारीत आंदोलक सहभागी झाल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ झाली आहे. रात्र झाल्याने आता आंदोलकांनी आंदोलन स्थळीच रात्रीचा मुक्काम ठोकण्याचा निर्धार केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक