निवडणूक रणांगणात गाजतोय एचएएलचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 01:57 AM2019-10-19T01:57:26+5:302019-10-19T01:57:46+5:30

कोणे एकेकाळी देशातील सरकारच्या उद्योग क्षेत्रातील नवरत्न असलेल्या एचएएचला प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. एचएएलकडील काम संपत आल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न गाजला होता. राफेलचे काम एचएएलला न मिळाल्याने या कारखान्यांच्या भवितव्यासमोर संकट ठाकले असल्याचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजला होता. मात्र, आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कामगारांनी वेतनाच्या मुद्द्यावर काम बंद आंदोलन केल्याने विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे.

The question of HAL is going on in the battlefield | निवडणूक रणांगणात गाजतोय एचएएलचा प्रश्न

निवडणूक रणांगणात गाजतोय एचएएलचा प्रश्न

Next
ठळक मुद्देसंरक्षण क्षेत्र : आधी काम नाही आता वेतनाचा प्रश्न

नाशिक : कोणे एकेकाळी देशातील सरकारच्या उद्योग क्षेत्रातील नवरत्न असलेल्या एचएएचला प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. एचएएलकडील काम संपत आल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न गाजला होता. राफेलचे काम एचएएलला न मिळाल्याने या कारखान्यांच्या भवितव्यासमोर संकट ठाकले असल्याचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजला होता. मात्र, आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कामगारांनी वेतनाच्या मुद्द्यावर काम बंद आंदोलन केल्याने विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे.
नाशिककरांनी (कै.) यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध खासदार म्हणून निवडून पाठविल्यानंतर त्यांनी कृतज्ञतेचा भाग म्हणून संरक्षण खात्याच्या अखत्यारितील एचएएलचा कारखाना नाशिक जिल्ह्णातील ओझर येथे दिला. १९६४ साली झालेल्या या कारखान्याला मिग २१ विमाने बनविण्यासाठी परवाना देण्यात आला होता. या एका कारखान्यामुळे नाशिकमध्ये कारखानदारी आली आणि औद्योगिक क्रांती झाली. परंतु आता एचएएलच्या नाशिक विभागाची अवस्था बिकट झाली आहे. एचएएलमध्ये मिगचे काम संपल्यानंतर देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यानंतर सुखोईची बांधणी आणि देखभाल दुरुस्तीचेदेखील काम सुरू आहे. मात्र ते संपल्यानंतर एचएएलकडे दुसरे काम नाही. पूर्वी सात ते आठ हजार कामगार असलेल्या या कारखान्यात आता साडेतीन हजार कामगार शिल्लक आहेत. नवीन विमानाचे काम सुरू करायचे असेल तर आता त्याची तयारी सुरू झाले तर काही वर्षांत पूर्ण क्षमतेने उत्पादन होऊ शकते. पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांची एचएएलमध्ये निर्मिती होईल, असे सांगितले जात होते. मात्र केंद्रातील सरकारने मेक इन इंडिया अंतर्गत ते खासगीकरणातून करण्यास दिले आणि एचएएलच्या भवितव्याचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला. माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी एचएएलला वाऱ्यावर सोडणार नाही असे अनेकदा सांगितले मात्र अद्याप नवीन काम सुरू झाले नाही.
सध्या गाजत असलेला प्रश्न कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भात असून, वेतनकराराचा कालावधी कमी करणे तसेच तसेच अपुरे वेतन असे अनेक मुद्दे आहेत. ऐन निवडणुकीत कामगारांनी संप केला असला तरी तो केवळ नाशिकमध्येच नाही तर एचएएलच्या सर्वच कंपन्यांमध्ये तो आहे. मात्र, यानिमित्ताने कामगार क्षेत्रातील अन्यायाचा मुद्दा मांडण्याची संधी विरोधकांनी सोडलेला नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या समजावून घेतल्या.
मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली दखल...
एचएएलचा प्रश्न गंभीर असून, त्याचा एकूणच कामगार क्षेत्रावर परिणाम होऊ शकत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील त्याची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी कामगार संघटनेला भेट तर दिलीच; परंतु गोदाकाठी झालेल्या सभेत एचएएलचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली.

Web Title: The question of HAL is going on in the battlefield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.