शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

दिव्यांगांसाठी ‘पीडब्ल्यूडी अ‍ॅप’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 01:28 IST

राज्य निवडणूक आयोगाने सहा महिन्यांपूर्वी पीडब्ल्यूडी अ‍ॅपद्वारे दिव्यांग मतदारांना अर्ज नोंदणीपासून, तर व्हीलचेअरसह इतर सुविधांची मागणी करता येणे शक्य आहे. उमेदवारांच्या माहितीसह बूथची माहिती मिळत असून, तक्रारी नोंदविण्याचीही सुविधा आहे. त्यामुळे दिव्यांगांना हे अ‍ॅप आधार ठरले असून, अ‍ॅपमुळे मतदानाचे प्रमाण वाढणे शक्य असल्याचे दिव्यांगांचे मत आहे.

ठळक मुद्देमतांचा टक्का वाढणार : व्हीलचेअरसह मिळणार अन्य सुविधा

नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने सहा महिन्यांपूर्वी पीडब्ल्यूडी अ‍ॅपद्वारे दिव्यांग मतदारांना अर्ज नोंदणीपासून, तर व्हीलचेअरसह इतर सुविधांची मागणी करता येणे शक्य आहे. उमेदवारांच्या माहितीसह बूथची माहिती मिळत असून, तक्रारी नोंदविण्याचीही सुविधा आहे. त्यामुळे दिव्यांगांना हे अ‍ॅप आधार ठरले असून, अ‍ॅपमुळे मतदानाचे प्रमाण वाढणे शक्य असल्याचे दिव्यांगांचे मत आहे.लोकसभा निवडणुकीत दिव्यांग नागरिकांना सहजतेने मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून निवडणूक आयोगाने पीडब्ल्यूडी अ‍ॅप कार्यान्वित केले होते. तेच अ‍ॅप आता विधानसभेत प्रथमच वापरले जाणार आहे. निवडणूक आयोग सुलभ मतदानांतर्गत दिव्यांग मतदारांना मतदानाच्या दिवशी व्हीलचेअर, स्वयंसेवक, रॅम्प या सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या सुविधांचा दिव्यांगांना लाभ घेता यावा, म्हणून पीडब्ल्यूडी अ‍ॅपचा वापर केला जात आहे.दिव्यांगांनी या अ‍ॅपच्या माध्यमातून व्हीलचेअरसाठी नोंदणी करायची आहे. निवडणूक संदर्भात काही तक्र ारी असतील, तर त्यासाठीही या अ‍ॅपचा वापर दिव्यांगांना करता येणार आहे. देशभरातील सर्व उमेदवारांची यादी या अ‍ॅपवर जाहीर करण्यात आल्याने, आपल्या मतदारसंघातील उमेदवार जाणून घेणे दिव्यांगांना शक्य झाले आहे. या अ‍ॅपद्वारे दिव्यांग मतदाराला मतदान प्रक्रियेची माहिती, बूथची माहिती, मतदानासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे अ‍ॅप वापरण्यास अतिशय सुलभ असून, या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत असल्याचे मत दिव्यांगांनी व्यक्त केले आहे. बूथ शोधण्यासाठी होणारी फरफट या अ‍ॅपमुळे टळली असून, मतदानासाठी सोयिस्कररीत्या मतदान केंद्रावर जाणेदेखील शक्य होणार आहे. या अ‍ॅपचे ५० हजारांपेक्षा अधिक यूजर्स असून, मतदान प्रक्रि येत दिव्यांगांना सर्व सोयींनी सहभागी करून घेतल्याचा आनंद व्यक्त केला जात आहे. पीडब्ल्यूडी अ‍ॅपद्वारे मतदानाचा हक्क बजावणे सोपे झाले आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या प्रश्नांना येत्या काळात अधिक बळकटी मिळेल.दिव्यांग मतदार राज्यात दोन लाखांवर४राज्यात यंदा दिव्यांग मतदारांची संख्या २ लाख २४ हजार १६२ इतकी आहे. त्यात अंधत्व किंवा कमी दृष्टी असलेले ३७ हजार ३२४, मूकबधिर २४ हजार ७७, शारीरिक अपंगत्व असलेले १ लाख ८ हजार २२ तर इतर अक्षमता असलेले ५४ हजार ३९ दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांगांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रि या अधिकाधिक सुलभ व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने यंदा मोठा पुढाकार घेतला आहे. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था तसेच अपंग कल्याण आयुक्तालय यांचीही याकामी मदत घेण्यात येत आहे. त्यांच्या साहाय्याने यंदा दिव्यांग मतदारांची विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात आली.मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक व्यवस्थामतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हीलचेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय मागणीनुसार मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक व्यवस्था तसेच व्हीलचेअरची सुविधाही प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. अ‍ॅपप्रमाणेच बहुतांश मतदान केंद्रे तळमजल्यावर आणल्याने मतदान प्रक्रि येत दिव्यांग मतदारांचा टक्कादेखील वाढणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय