‘मुकणे’तून ९०० दलघफू आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 01:01 AM2019-08-28T01:01:40+5:302019-08-28T01:02:15+5:30

शहराला पाणीपुरवठ्यासाठी नेहमी गंगापूर धरणातून पाणी आरक्षण वाढवून घेण्यावर महापालिकेचा भर असतो. यंदा मात्र गंगापूरऐवजी मुकणे धरणातून आरक्षण वाढवून घेणार आहे. गेल्यावर्षी या धरणातून पाणी आरक्षण ३०० दशलक्ष घनफूट आरक्षित होते, मात्र यंदा याच धरणातून ९०० दशलक्ष घनफूट आरक्षण मागण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी मंगळवारी (दि.२७) दिली.

 'Pumpkin' Reservations for 90 fries | ‘मुकणे’तून ९०० दलघफू आरक्षण

‘मुकणे’तून ९०० दलघफू आरक्षण

googlenewsNext

नाशिक : शहराला पाणीपुरवठ्यासाठी नेहमी गंगापूर धरणातूनपाणी आरक्षण वाढवून घेण्यावर महापालिकेचा भर असतो. यंदा मात्र गंगापूरऐवजी मुकणे धरणातून आरक्षण वाढवून घेणार आहे. गेल्यावर्षी या धरणातून पाणी आरक्षण ३०० दशलक्ष घनफूट आरक्षित होते, मात्र यंदा याच धरणातून ९०० दशलक्ष घनफूट आरक्षण मागण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी मंगळवारी (दि.२७) दिली.
शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ९७ टक्के भरले असून, त्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी प्रथेप्रमाणे मंगळवारी (दि.२७) जलपूजन केले. यावेळी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या वतीने गंगापूर धरणातून सर्वाधिक पाणी आरक्षण घेत असते. तथापि, गंगापूर धरणात गाळ साचल्याने साठवण क्षमता कमी होत आहे. त्यातच चालू वर्षी पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी उपसा करण्यातही अनेक तांत्रिक अडचणी आल्या. या धरणावर ताण वाढत आहे. धरणातून महापालिकेने पाणी आरक्षण वाढवून मागितले की जिल्हाधिकाऱ्यांकडे होणाºया बैठकीत शहरात उधळपट्टी होत असल्याचा मुद्दा पुढे केला जातो. यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणुका असल्याने धरणातून चांगले आरक्षण मिळाले होते. यात गंगापूर धरणातून ४२०० दशलक्ष घनफूट, दारणा आणि मुकणे धरणातून प्रत्येकी ३०० म्हणजेच एकूण ४८०० दलघफू आरक्षण मिळाले होते. त्यावेळी मुकणे थेट जलवाहिनी योजना अपूर्ण होती. दरम्यान,जलपूजन सोहळ्यास उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी सभापती उध्दव निमसे, आयुक्त राधाकृष्ण गमे, माजी सभापती हिमगौरी आडके, सभागृह नेता सतीश सोनवणे, अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे, राष्ट्रवादीचे गजानन शेलार, नदींनी बोडके यांच्यासह अन्य नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेने आता या धरणावरून अधिकाधिक भागात पाणीपुरवठा करण्यासाठी वितरण वाहिन्यांचे जाळे विणले आहे. त्यामुळे या धरणावरून पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून ४२००, मुकणे धरणातून ९०० तर दारणा धरणातून पुन्हा ३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मागण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
चेहेडी शुद्धीकरण लवकरच
चेहेडी बंधाºयाच्या जवळ देवळाली कॅम्प आणि भगूर नगरपालिकेचे मलजलयुक्त पाणी सोडले जात असल्याने महापालिकेला पावसाळ्याच्या आधी बंधाºयातून पाणी आटल्यानंतर अडचण निर्माण होते.
४ आता महापालिकेच्या वतीने लवकरच बंधाºयात ज्या भागात मजजल सोडले जाते त्याच्या पुढे जाऊन पाणी घेण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. पुढील वर्षी उन्हाळ्याच्या आत हा विषय मार्गी लावण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

Web Title:  'Pumpkin' Reservations for 90 fries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.