पर्स ओढून चोरट्याने लांबवली पोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 01:21 IST2021-04-17T01:20:28+5:302021-04-17T01:21:19+5:30
आडगाव शिवारातील धात्रक फाटा परिसरात सागर व्हिलेज येथील बंगला क्रमांक ५७ ची लोखंडी खिडकी ओढून सोन्याची पोत असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवारी (दि.१४) घडली.

पर्स ओढून चोरट्याने लांबवली पोत
नाशिक : आडगाव शिवारातील धात्रक फाटा परिसरात सागर व्हिलेज येथील बंगला क्रमांक ५७ ची लोखंडी खिडकी ओढून सोन्याची पोत असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवारी (दि.१४) घडली. याप्रकरणी हिराबाई सोनू केदार (७०) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पर्ससोबत सुमारे ४० हजार रुपयाची सोन्याची पोतही चोरून नेली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख व सहायक पोलीस निरीक्षक तोडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.