तुंगार यांच्या ह्यज्योतिर्मयह्ण आत्मचरित्राचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 22:53 IST2022-05-23T22:52:55+5:302022-05-23T22:53:51+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी नगराध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे माजी विश्वस्त स्व. यादवराव लक्ष्मण तुंगार यांच्या ह्यज्योतिर्मयह्ण या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा सोमवारी (दि. २३) मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

त्र्यंबकेश्वर येथे स्व. यादवराव तुंगार यांच्या ह्यज्योतिर्मयह्ण आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, दिनकर पाटील, संपतराव सकाळे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, चेतननाथ महाराज, शिवराम झोले, मुरलीधर पाटील, महंत श्रीशंकरानंद सरस्वती, गोविंदराव मुळे, महंत रघुनाथ महाराज आदी.
त्र्यंबकेश्वर : येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी नगराध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे माजी विश्वस्त स्व. यादवराव लक्ष्मण तुंगार यांच्या ह्यज्योतिर्मयह्ण या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा सोमवारी (दि. २३) मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
कार्यक्रमाला आमदार हिरामण खोसकर, दिनकर पाटील, संपतराव सकाळे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, चेतननाथ महाराज, माजी आमदार शिवराम झोले, मुरलीधर पाटील, महंत श्रीशंकरानंद सरस्वती, समितीचे अध्यक्ष गोविंदराव मुळे, महंत रघुनाथ महाराज ऊर्फ फरशीवाले बाबा, पुरुषोत्तम कडलग, पुंडलिक थेटे, प्रदीप तुंगार, राजाभाऊ शिरसाठ, कैलास घुले, सुरेश गंगापुत्र, बाळासाहेब सावंत, संतोष कदम, ॲड. श्रीकांत गायधनी, ओमप्रकाश सारडा, परवेझ कोकणी, नबीयुन शेख, भूषण अडसरे, कैलास मेढेपाटील, सत्यप्रिय शुक्ल, दिलीप तुंगार, त्रिवेणी तुंगार आदी उपस्थित होते. यावेळी सुरेश गंगापुत्र यांनी यादवराव तुंगार यांच्या जीवनातील विविध कटू, गोड प्रसंगांचा आढावा घेतला. तुंगार परिवारातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना यादवराव तुंगार यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. यादवराव तुंगार खऱ्या अर्थाने विकास पुरुष होते. गावाच्या विकासासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. त्यांच्या हयातीतच या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा त्यांचा मानस होता. पण नियतीला ते मान्य नव्हते. त्यांनी आपल्या कार्यकाळात नगरपरिषदेला उत्पन्नाचे अनेक स्रोत मिळवून दिले. त्यामुळे शहराची भरभराट झाल्याचे मान्यवरांनी सांगितले. यावेळी प्रकाशन समितीचे सदस्य उपस्थित होते.