केपीजे महाविद्यालयात नियतकालिकेचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 18:50 IST2021-02-06T18:48:12+5:302021-02-06T18:50:03+5:30
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सह्याद्री वार्षिक नियतकालिकेचे प्रकाशन मविप्र इगतपुरी तालुका संचालक भाऊसाहेब खातळे यांच्या हस्ते पार पडले.

इगतपुरी महाविद्यालयात नियतकालिका प्रकाशनप्रसंगी भाऊसाहेब खातळे, डॉ. पी. आर. भाबड, प्रा. देवीदास गिरी, विजय कडलग, प्रा. डॉ. दत्तात्रय वेलजाळी आदी.
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सह्याद्री वार्षिक नियतकालिकेचे प्रकाशन मविप्र इगतपुरी तालुका संचालक भाऊसाहेब खातळे यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, उपप्राचार्य प्रा. देवीदास गिरी, महाविद्यालय विकास समिती सदस्य विजय कडलग, सागर बऱ्हे, पंढरीनाथ बऱ्हे, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य बाळासाहेब गाढवे, बाळासाहेब वालझाडे, नगरसेवक सुनील रोकडे, पांडुरंग शिंदे, रोहिदास उगले, किरण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. देवीदास गिरी यांनी केले. प्रास्ताविक आणि आभा प्रदर्शन सह्याद्री नियतकालिकेचे संपादक प्रा. डॉ. दत्तात्रय वेलजाळी यांनी केले.