निमा विमेन्स फोरमतर्फे महिलांसाठी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:43 IST2019-06-08T00:42:48+5:302019-06-08T00:43:10+5:30
निमा वुमेन्स फोरमतर्फे मेन्स्ट्रुअल हायजिन ओरिएंटेशन प्रोग्राम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विविध रुग्णालय पंचकर्म केंद्र आणि क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी महिला कामगारांसाठी मासिक पाळी स्वच्छता जनजागरण केले गेले.

निमा विमेन्स फोरमतर्फे महिलांसाठी जनजागृती
नाशिक : निमा वुमेन्स फोरमतर्फे मेन्स्ट्रुअल हायजिन ओरिएंटेशन प्रोग्राम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विविध रुग्णालय पंचकर्म केंद्र आणि क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी महिला कामगारांसाठी मासिक पाळी स्वच्छता जनजागरण केले गेले.
डॉ. पारिख यांनी स्त्रियांच्या या विशेष दिवसातील काळजी घेण्याचे महत्त्व व त्याची गरज अधोरेखित केली. वाव सोशल ग्रुपच्या अश्विनी नेहारकर, रेखा देवरे यांच्या ग्रुपने सॅनिटरी नॅपकीनची योग्य विल्हेवाट काळाची गरज यावर मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ता अश्विनी चौमल यांनी सॅनिटरी नॅपकीनला पर्यावरणपूरक पर्याय म्हणून मेन्स्ट्रुअल कपची माहिती व त्याचा वापर याविषयी माहिती दिली. राजश्री गांगुर्डे या प्रमुख पाहुण्या म्हणून कार्यक्र मास उपस्थित होत्या व त्यांनी शासनामध्ये मासिक पाळी स्वच्छतेविषयी काय तरतूद आहे त्याची माहिती दिली.
यावेळी मासिक पाळीच्या विषयावर निर्भीडपणे समोर येऊन आपल्या समस्या विचार मांडण्याची काळाची गरज आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी सॅनिटरी नॅपकिनला पर्याय साधनांचा गांभीर्याने विचार करावा, असे विमेन्स फोरमच्या अध्यक्ष डॉ. प्रणीता गुजराती यांनी नमूद केले.
सूत्रसंचालन दीप्ती बढे यांनी केले. यावेळी डॉ. श्रुती कुलकर्णी, डॉ. प्रतिभा वाघ आदींसह फोरमच्या सदस्य उपस्थित होत्या.