मनपा आरोग्य विभागाच्या वतीने कचरा वर्गीकरणाची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:00 IST2018-07-26T00:00:38+5:302018-07-26T00:00:57+5:30
घंटागाडीत कचरा टाकताना नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून टाकावा, यासाठी मनपा आरोग्य विभागाच्या वतीने सातपूर परिसरात प्रबोधन आणि जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

मनपा आरोग्य विभागाच्या वतीने कचरा वर्गीकरणाची जनजागृती
सातपूर : घंटागाडीत कचरा टाकताना नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून टाकावा, यासाठी मनपा आरोग्य विभागाच्या वतीने सातपूर परिसरात प्रबोधन आणि जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी घंटागाडीत कचरा टाकताना ओला आणि सुका असे वर्गीकरण करून टाकावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने ठोस कार्यवाही केली जात आहे. सातपूर विभागातदेखील विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, विभागीय स्वच्छता निरीक्षक माधुरी तांबे, केतन मारू यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच प्लॅस्टिकबंदीची माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे. वापरात असलेल्या प्लॅस्टिकमुळे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करूनच कचरा घंटागाडीत टाकण्यासाठी गल्लीगल्लीत जाऊन मोशमी जाधव व त्यांचे सहाकरी प्रबोधन करीत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये जागृती होत आहे.