Public awareness at Gonde Dumala through kirtan for Shriram Temple | श्रीराम मंदिरासाठी कीर्तनाद्वारे गोंदे दुमाला येथे जनजागृती

गोंदे दुमाला येथे श्रीराम मंदिर बांधकामासाठी निधी संकलनाविषयी कीर्तनातून जनजागृती करताना एकनाथ महाराज सदगीर.

ठळक मुद्देतालुक्यातील कलाकारांच्या साहाय्याने छोटे मोठे कार्यक्रम सादर

नांदूरवैद्य : अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी निधी संकलनाकरिता इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे कीर्तनकार एकनाथ महाराज सद‌्गीर यांच्या कीर्तनाचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.

श्रीराम मंदिराच्या कामास तातडीने सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील अनेक संस्था तसेच नागरिक मदतीसाठी पुढे येत आहेत. अनेक ठिकाणी निधी संकलनासाठी टाळमृदंगाच्या गजरात प्रभात फेरी काढत जनजागृती करण्यात येत आहे. तालुक्यातील कलाकारांच्या साहाय्याने छोटे मोठे कार्यक्रम सादर करत निधी संकलनाचे काम जोमात सुरू असून इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील ग्रामस्थांच्या वतीने विश्व हिंदू परिषदेचे ठाणे जिल्हाध्यक्ष तसेच नामवंत कीर्तनकार एकनाथ महाराज सद‌्गीर यांच्या कीर्तनाचे आयोजन करून निधी संकलनाविषयी जनजागृती करण्यात आली.

यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, नाशिक जिल्हा सरचिटणीस सुनील बच्छाव, श्रीराम मंदिर अभियान नाशिक जिल्हाप्रमुख प्रमुख देविदास वारूंगसे, जिल्हा चिटणीस शरद कासार, सुनील जाधव, रवी गव्हाणे, रवी भागडे, सजन नाठे, चिटणीस हिरामण नाठे, सागर नाठे, मोहन जाधव, तानाजी नाठे, लालू नाठे, गणेश गवते, संतोष राजोळे, हनुमंता जाधव, गणेश नाठे, निवृत्ती नाठे, विनोद नाठे आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Web Title: Public awareness at Gonde Dumala through kirtan for Shriram Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.