वाहतूक नियमांविषयी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:28 IST2019-03-16T23:15:58+5:302019-03-17T00:28:50+5:30
धकाधकीच्या जीवनात गतिमान झालेल्या रस्त्यांवरील मानवी चुकांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण बघता वाहतुकीचे नियम व सुरक्षित वाहतूक याविषयी जनजागृती करण्याच्या सामाजिक जाणिवेतून शुक्रवारी (दि.१५) ‘बिइंग जेनेसिस’ सामाजिक संस्थेने नाशिक शहर पोलिसांच्या सहकार्याने शहरातील जेहान सर्क ल सिग्नलवर रहदारीचे नियमांविषयी नागरिकांचे प्रबोधन केले.

वाहतूक नियमांविषयी जनजागृती
नाशिक : धकाधकीच्या जीवनात गतिमान झालेल्या रस्त्यांवरील मानवी चुकांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण बघता वाहतुकीचे नियम व सुरक्षित वाहतूक याविषयी जनजागृती करण्याच्या सामाजिक जाणिवेतून शुक्रवारी (दि.१५) ‘बिइंग जेनेसिस’ सामाजिक संस्थेने नाशिक शहर पोलिसांच्या सहकार्याने शहरातील जेहान सर्क ल सिग्नलवर रहदारीचे नियमांविषयी नागरिकांचे प्रबोधन केले.
‘बिइंग जेनेसिस’ सामाजिक संस्था व नाशिक शहर पोलिसांनी जेहान सर्कल परिसरात हेल्मेटचा वापर, सीट बेल्टचा वापर, सिग्नलचे पालन आदी बाबींवर नागरिकांचे प्रबोधन केले. या मोहिमेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला असून, शहरातील अनेक ठिकाणी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले. यावेळी रहदारीच्या नियमांचे उस्फूर्तपणे पालन करणाऱ्या नागरिकांचा चिमुकल्यांकडून गुलाबपुष्प देऊन सन्मान करतानाच ‘रहदारीच्या नियमाची नव्हे सक्ती...ही तर सुरक्षित जीवनाची गुरुकिल्ली’ यासारखे महत्त्वाचे संदेश देत नागरिकांची जनजागृती कतेरण्यात आली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक फुलसिंग भोये, उपनिरीक्षक प्रवीण माळी यांच्यासह बिइंग जेनेसिसचे सोनाली कुलकर्णी, राहुल रायकर, मानसी रायकर, शीतल गायकवाड, कृष्णा पगारे, राहुल दिंडोर्डे, दीपक, एलिटचे शैलेंद्र गायकवाड, सक्षम फाउंडेशनचे रजत शर्मा, राम पवार आदी उपस्थित होते.
हा उपक्रम शहरात विविध ठिकाणी सातत्याने चालू ठेवण्याची योजना असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.