कळवण नगरपंचायतच्या माध्यमातून बचत गटांना योजनांचा लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:15 IST2021-09-24T04:15:44+5:302021-09-24T04:15:44+5:30
कळवण : केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविल्या जातात. नगरपंचायतीअंतर्गत येणाऱ्या योजना राबवितांना कळवण ...

कळवण नगरपंचायतच्या माध्यमातून बचत गटांना योजनांचा लाभ द्या
कळवण : केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविल्या जातात. नगरपंचायतीअंतर्गत येणाऱ्या योजना राबवितांना कळवण शहरातील महिला बचत गटांना प्रथम प्राधान्य देऊन महिला सक्षमीकरण धोरणांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख सत्यवती आहेर यांनी केली आहे.
कळवण नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांची सत्यवती आहेर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील बचत गटाच्या अध्यक्ष व सचिव यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन महीला बचत गटातील समस्या, बचत गट नगरपंचायतला जोडणे व अन्य विषयांवर सकारात्मक चर्चा करून निवेदन दिले. कळवण नगरपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांची स्थापना झाली असून, विविध उद्योग, व्यवसाय या गटांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. मात्र बहुतांशी बचत गटांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना महिला बचत गटाच्या माध्यमातून राबविल्या जातात. महिला बचत गटांना नगरपंचायतीच्या योजनांची माहिती मिळावी, महिला सक्षमीकरण करण्याकरिता येणाऱ्या शासकीय योजनाचा लाभ महिला बचत गटांना मिळावा, शहरातील बचत गट हे नगरपंचायतीला जोडून महिला बचत गटांना विविध योजनांचा लाभ मिळावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी अर्चना पगार, जयश्री अमृतकार, सरला जाधव, गीताजंली बोरसे, विमल पगार, संगीता अमृतकार आदी उपस्थित होते.
---------------------
कळवण नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांना निवेदन देताना सत्यवती आहेर, अर्चना पगार, जयश्री अमृतकार, सरला जाधव, गीताजंली बोरसे, विमल पगार, संगीता अमृतकार आदी. (२३ कळवण निवेदन)
230921\23nsk_9_23092021_13.jpg
२३ कळवण निवेदन