मनमाड पालिकेच्या वारसदार कामगारांना नियुक्ती पत्र प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 13:28 IST2020-01-08T13:28:43+5:302020-01-08T13:28:51+5:30
मनमाड: मनमाड पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर ,गटनेते गणेश धात्रक यांच्या हस्ते वारसदार मागासवर्गीय सफाई कामगाराना नेमणूक पत्र देण्यात आली .

मनमाड पालिकेच्या वारसदार कामगारांना नियुक्ती पत्र प्रदान
मनमाड: मनमाड पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर ,गटनेते गणेश धात्रक यांच्या हस्ते वारसदार मागासवर्गीय सफाई कामगाराना नेमणूक पत्र देण्यात आली .मागासवर्गीय सफाई कामगाराच्या वैद्यकीय वयोमानानुसार वारसांना लाडकमिटिच्या शिफारशी नुसार रिक्त जागेवर नियुक्ती पत्र देण्यात आले आहे .यावेळी राजेंद्र पाटील, लेखाधिकारी नानासाहेब जाधव,शरद बोडके, मयूर बोरसे, विनय आहेर बाबासाहेब दराडे आदी उपस्थित होते.