मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ मालेगावी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 00:47 IST2022-02-24T00:46:44+5:302022-02-24T00:47:26+5:30

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपच्या विरोधात येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.२३) सायंकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने केली.

Protests in Malegaon against Malik's arrest | मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ मालेगावी निदर्शने

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ मालेगावी महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करतांना राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख,राजेंद्र भोसले, एजाज उमर, फारुख फैजूला आदीसह कार्यकर्ते

मालेगाव : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपच्या विरोधात येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.२३) सायंकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने केली.

केंद्रातील भाजप शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई करीत आहे. भाजपाचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा हे सूडबुद्धीने कारवाया करीत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अटकेची कारवाई केली जात आहे, ही बाब निषेधार्थ आहे .नवाब मलिक ईडीचा व भाजपचा भ्रष्टाचार उघड करीत असल्यामुळेच त्यांच्यावर सूडबुद्धीने ईडीच्या आड अटकेची कारवाई करण्यात येत असल्याचे माजी आमदार आसिफ शेख यांनी यावेळी सांगितले. नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ व भाजपाच्या विरोधात येथील राष्ट्रवादी काँग्रेसने महात्मा गांधी पुतळ्याजवळ सायंकाळी सहा वाजता जोरदार निदर्शने केली. यावेळी केंद्रातील भाजपा शासनावर टीका करण्यात आली. या आंदोलनात माजी आमदार आसिफ शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र भोसले, रफिक खजूरवाला, सय्यद मुस्लीम, नईम पटेल,मुजाहिद, एजाज उमर, फारुख फैजूला आदी सहभागी झाले होते.

Web Title: Protests in Malegaon against Malik's arrest