निषेध सभा : सीएए, एनआरसीमुळे देशची धर्मनिरपेक्षता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 04:19 PM2020-01-19T16:19:24+5:302020-01-19T16:21:14+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आहे, त्यामुळे आता कुठल्याही अन्य कायद्याची अजिबात गरज उरलेली नाही.

Protests: CAA, NRC threatens secularism of country | निषेध सभा : सीएए, एनआरसीमुळे देशची धर्मनिरपेक्षता धोक्यात

निषेध सभा : सीएए, एनआरसीमुळे देशची धर्मनिरपेक्षता धोक्यात

Next
ठळक मुद्देविविध जाती, धर्माचे लोक या देशात गुण्यागोविंदाने नांदत आहेसरकारला केवळ सीएए, एनआरसीसारख्या गोष्टींमध्येच रसमहापुरूषांच्या प्रतिमांनी वेधले लक्ष

नाशिक : केंद्र सरकार देशभरात आणू पाहणाऱ्या सीएए, एनआरसी कायदा हा भारतीय संविधानाच्या विरोधातला आहे. हा कायदा तातडीने रद्द करून देशाची अराजकतेकडे होणार वाटचाल रोखावी आणि धर्मनिरपेक्ष राष्टÑाचा भारताचा नावलौकिक टिकवावा, असा सूर सीएए,एनआरसीविरूध्द आयोजित महिलांच्या निषेध सभेतून उमटला.
संविधानप्रेमी नाशिककर मनपा पुर्व विभाग व राहत फाउण्डेशनच्या संयुक्त विद्यमाने वडाळारोडवरील साहिल लॉन्समध्ये रविवारी (दि.१९) सीएए, एनआरसी, एनपीआरविरूध्द महिलांची निषेध सभा घेण्यात आली. यावेळी विचारमंचावर प्रमुख वक्ता म्हणून मुंबईच्या रिजवी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सादीया शेख, छात्रभारतीच्या युवती संघटक स्वाती त्रिभुवन, नॅशनल उर्दू वरिष्ठ महाविद्यालयाच्या अल्फीया शेख, छात्रभारतीच्या शहर उपाध्यक्ष आम्रपाली वाकळे, मुस्लीम महिला धर्मगुरू आलेमा फरहत बाजी, आलेमा नादेरा बाजी, डॉ. फौजिया बाजी उपस्थित होत्या.
यावेळी सादियाने उर्दू शेरपासून आपल्या भाषणाला सुरूवात करत उपस्थित महिलांचे लक्ष वेधले. ती म्हणाली, या देशाच्या महिलांना कमी लेखले जाते, हे चुकीचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आहे, त्यामुळे आता कुठल्याही अन्य कायद्याची अजिबात गरज उरलेली नाही. त्यांच्या कायद्यान्वये देश आतापर्यंत उत्तरोत्तर प्रगती करत असून विविध जाती, धर्माचे लोक या देशात गुण्यागोविंदाने नांदत आहे; मात्र काही विशिष्ट विचारधारेच्या लोकांना ते बघवत नाही. सीएए, एनआरसी,एनपीआर यांसारखे हातखंडे ते अवलंबवून देशाची विविधतेतील एकता व धर्मनिरपेक्षता धोक्यात आणू पाहत आहे, असे सादिया म्हणाली.
‘हमे चाहीये आजादी’ ही घोषणा पुन्हा देण्यासाठी मोदी सरकारने देशाच्या तरूणाईला मजबूर केले आहे. या देशातील विद्यापिठांमध्ये काही समाजकंटक धुडगूस घालतात. राज्यांच्या कानाकोपºयात महिला, तरूणींच्या अब्रूशी खेळले जात असून महिलांची सुरक्षितता धोक्यात सापडली असताना सरकारला केवळ सीएए, एनआरसीसारख्या गोष्टींमध्येच रस वाटतो, हे दुर्दैव असल्याचे आम्रपालीने सांगितले.

महापुरूषांच्या प्रतिमांनी वेधले लक्ष
निषेध सभेच्या ठिकाणी महिलांची स्वाक्षºयाही घेण्यात आल्या. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. विचारमंचाच्या पुढे राष्टÑध्वज तिरंगा उभारण्यात आला होता. तसेच उपस्थित महिलांनी हातात राष्टÑध्वजासह महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, अश्पाकउल्ला खान यांसारख्या महापूरुषांच्या प्रतीमाही घेत सहभा नोंदविला.

Web Title: Protests: CAA, NRC threatens secularism of country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.