आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ परिचारिकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:58 IST2020-01-29T12:46:04+5:302020-01-29T12:58:00+5:30

मालेगाव : देवळा बस अपघातात मृत झालेल्या परिचारिकेबद्दल सोशल मिडियावर श्रद्धांजली वाहताना आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या नाशिक सामान्य रूग्णालयातील प्रशासन अधिकारी व्ही. डी. पाटील यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी येथील सामान्य रूग्णालयातील परिसेविका व परिचारिकांनी १५ मिनिटे कामकाज बंद ठेवून रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले होते.

 Protestors' dharna agitation in protest of offensive post | आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ परिचारिकांचे धरणे आंदोलन

आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ परिचारिकांचे धरणे आंदोलन

मालेगाव : देवळा बस अपघातात मृत झालेल्या परिचारिकेबद्दल सोशल मिडियावर श्रद्धांजली वाहताना आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या नाशिक सामान्य रूग्णालयातील प्रशासन अधिकारी व्ही. डी. पाटील यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी येथील सामान्य रूग्णालयातील परिसेविका व परिचारिकांनी १५ मिनिटे कामकाज बंद ठेवून रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाटील यांच्यावर कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मालेगाव - देवळा रस्त्यावर बसच्या अपघतात मालेगाव सामान्य रूग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिकेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वैद्यकीय सेवे संदर्भातील कर्मचा-यांच्या व्हाटस्अप ग्रुपवर पाटील यांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्या पोस्टचे तीव्र पडसाद उमटले. बुधवारी सकाळी येथील सामान्य रूग्णालयातील कर्मचाºयांनी कामकाज बंद ठेवून रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले होते. नाशिकच्या वरिष्ठ अधिकाºयांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर रूग्णसेवा पूर्ववत सुरू झाली होती. या आंदोलनात परिसेविका अलका पवार, मंगला घुसळे, सुनिता जाधव, नुरजहाँ शेख, जयश्री बैरागी, जयश्री विटाईकर, रंजना साळवे, तुषार सूर्यवंशी, विजय अल्लाड, अरुण शेळके आदिंसह कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title:  Protestors' dharna agitation in protest of offensive post

टॅग्स :Nashikनाशिक