नाशकात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा

By Suyog.joshi | Updated: December 4, 2023 14:49 IST2023-12-04T14:49:35+5:302023-12-04T14:49:48+5:30

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर व महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मोर्चाला दुपारी ११:३० वाजता शालीमार येथून प्रारंभ करण्यात आला.

Protest march of Shiv Sena's Thackeray group in Nashakat | नाशकात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा

नाशकात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा

सुयोग जोशी

नाशिक - जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची तातडीने मदत द्यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सोमवारी (दि.४) जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी, ट्रॅक्टर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसैनिकांसह शेतकरी, महिला यांनी सहभाग घेतला होता.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर व महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मोर्चाला दुपारी ११:३० वाजता शालीमार येथून प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर मोर्चा मेनरोड, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला. तेथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात शिवसैनिकांनी दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या व्यवस्था करावी, जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना करावी, पिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीला ऑनलाइन कळवावे यासाठी इतर मागण्या करण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चामुळे शालीमारसह रविवार कारंज, मेनरोड व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

Web Title: Protest march of Shiv Sena's Thackeray group in Nashakat