मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:25 IST2020-07-23T21:55:48+5:302020-07-24T00:25:22+5:30
मालेगाव : नांदेड येथे वृत्तपत्र विक्रेत्याला महापालिका प्रशासनाने शिवीगाळ करून पाच हजार रुपये खंडणीची मागणी करीत दमदाटी केल्याच्या घटनेचा येथील मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे निषेध
मालेगाव : नांदेड येथे वृत्तपत्र विक्रेत्याला महापालिका प्रशासनाने शिवीगाळ करून पाच हजार रुपये खंडणीची मागणी करीत दमदाटी केल्याच्या घटनेचा येथील मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.
नांदेड महानगरपालिका प्रशासन कर्मचाऱ्याच्या कृत्याच्या निषेधार्थ मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वृत्तपत्र वितरण डेपोवर एकत्र येऊन निषेध नोंदवला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष पापान्ना यादव, रवींद्र कुलकर्णी, अशोक नागमोती, वाल्मीक पगारे, संजय तरवटे, संतोष शर्मा, गजानन यादव, दिनेश जाधव, मोहन आहिरे, संजय अहिरे, दुपेश यादव, पांडू यादव, मुकेश सोनार, महाजन, सोमनाथ धामणे, रमेश पाटील, भाऊ पाटील, विनोद वाघ, गोपाल मोरे, राजू पाटील, मनोहर भोसले उपस्थित होते.