शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
3
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
4
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
5
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
6
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
7
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
8
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
9
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
10
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
11
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
12
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
13
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
14
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
15
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
16
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
17
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
18
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
19
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

पिंपळगाव टोल नाक्यावरील कथित गैरप्रकाराच्या निषेधार्थ धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 23:21 IST

पिंपळगाव बसवंत : येथील टोल नाक्यावर दररोज होत असलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या निषेधार्थ माजी जिल्हा परिषद सदस्य व त्यांच्या समर्थकांनी धरणे धरीत तत्काळ चौकशीची मागणी केली. याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईचे आश्वासन प्रकल्प व तांत्रिक संचालकांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, यावेळी टोल नाका व्यवस्थापकास मारहाणही करण्यात आली.

ठळक मुद्देव्यवस्थापकास मारहाण : प्रकल्प संचालकाकडून चौकशीचे आश्वासन

पिंपळगाव बसवंत : येथील टोल नाक्यावर दररोज होत असलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या निषेधार्थ माजी जिल्हा परिषद सदस्य व त्यांच्या समर्थकांनी धरणे धरीत तत्काळ चौकशीची मागणी केली. याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईचे आश्वासन प्रकल्प व तांत्रिक संचालकांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, यावेळी टोल नाका व्यवस्थापकास मारहाणही करण्यात आली.पिंपळगाव टोल नाका गोंदे व शिरवाडे यांचे कलेक्शन स्कायलार्क कंपनी आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून वान नावाचे सॉफ्टवेअर टोल नाक्यावरील १६ लेन पैकी १४ लेनवर कार्यरत आहे. टोल नाक्याहून जेवढी वाहने जातील ते त्या वान सॉफ्टवेअरमार्फत दर्शविले जाते. त्यानुसार ठरवून दिलेली रक्कम अदा करण्यात येते.कोविड काळात केंद्र शासनाने दर दिवसाला ३४ लाख रुपयांचे सूट दिली. याचा पुरेपूर फायदा घेत लेन क्र. २ आणि लेन क्र. १४ या ठिकाणी तांत्रिक हेराफेरी करून वान सॉफ्टवेअरऐवजी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने दुसरे खासगी सॉफ्टवेअर सुरू करून दररोज लाखो रुपयांची लूट केली जात असल्याची माहिती मिळताच निफाड तालुक्यातील भाजपचे विधानसभा अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पिंपळगाव टोलनाका गाठून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरीत धरणे आंदोलन केले. यावेळी एका कार्यकर्त्याकडून व्यवस्थापक राजपूत यांना मारहाणदेखील करण्यात आली.वरिष्ठ पिंपळगाव टोल नाक्यावर समक्ष येत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन कदम यांच्याशी सविस्तर चर्चा करीत याठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याचे आधीच लक्षात आले होते. त्याची चौकशी व्हावी यासाठी दिल्लीच्या कार्यालयात पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले. तसेच तांत्रिक संचालक दिलीप पाटील यांनी चौकशी करुन योग्य ती कारवाई करणार असल्याचे पत्र दिल्यावर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली.दिवसाढवळ्या होणाऱ्या या आर्थिक लुटीची चौकशी मी वैयक्तिक स्तरावर केली असता, स्कायलार्क टोल प्लाझा दिवसाला होणारी टोल वसुली नॅशनल हायवेपासून लपवित असल्याचे निदर्शनास आले. पिंपळगाव टोल प्लाझावरून दिवसाला लाखो रुपयांची टोल वसुली होत असते. जी महिन्याकाठी करोडो रुपयांच्या घरात असते. नॅशनल हाय वे, नाशिकचे प्रकल्प संचालक, व्यवस्थापक यांच्या निष्काळजीपणामुळे ही करोडो रुपयांची रक्कम सरकारच्या खात्यात जमा होत नाही. सरकारच्या तिजोरीवर खुलेआम डल्ला मारला जात असून, याचा मी तीव्र निषेध करतो.- यतीन कदम, माजी जिल्हा परिषद सदस्यआम्ही आजपर्यंत एकाही शेतकऱ्याची किंवा वाहनधारकांची लूट केलेली नाही. त्याची रीतसर पावती दिली आहे तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे ठरलेली रक्कम अदा केली आहे. मात्र यतिन कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी टोल नाक्यावर येऊन दमदाटी तसेच मारहाण करीत टोल नाक्यावर भ्रष्टाचार होत असल्याचे वदवून घेतले. त्यांना जो आरोप करायचा होता, तो त्यांनी कायदेशीररीत्या करणे गरजेचे होते, मात्र मारहाण करणे चुकीचे आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार देणार आहे.- योगेशसिंह राजपूत, टोल नाका व्यवस्थापकपिंपळगाव टोल नाक्यावरील कथित गैरप्रकाराची सखोल चौकशी करण्यात येत असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात कार्यालयाने मे २०२१ मध्येच चौकशी करण्याविषयी नवी दिल्ली येथील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) मुख्यालयाकडे कळविले आहे.- बी. एस. साळुंके, प्रकल्प संचालक, नाशिक 

टॅग्स :tollplazaटोलनाकाCrime Newsगुन्हेगारी