शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पुरोहित एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 01:58 IST

पालकांनी मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मुंबई स्वप्ननगरी, पुणे विद्यानगरी, तर कलाकारांसाठी नाशिक मायाळू प्रेमळनगरी आहे, असे प्रतिपादन सिनेनाट्य अभिनेत्री इला भाटे यांनी केले. पुरोहित एकांकिका स्पर्धेत इगतपुरी महात्मा गांधी विद्यालयाच्या ‘आम्हाला पण शाळा हवी’ या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा पुरस्कार देण्यात आला.

ठळक मुद्दे‘आम्हाला पण शाळा हवी’ला सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा पुरस्कार

नाशिकरोड : पालकांनी मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मुंबई स्वप्ननगरी, पुणे विद्यानगरी, तर कलाकारांसाठी नाशिक मायाळू प्रेमळनगरी आहे, असे प्रतिपादन सिनेनाट्य अभिनेत्री इला भाटे यांनी केले. पुरोहित एकांकिका स्पर्धेत इगतपुरी महात्मा गांधी विद्यालयाच्या ‘आम्हाला पण शाळा हवी’ या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा पुरस्कार देण्यात आला.पुरूषोत्तम इंग्लिश स्कूलमधील धामणकर सभागृहात २१ व्या कै. वा.श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी बोलताना सिनेनाट्य अभिनेत्री भाटे म्हणाल्या की, नाटक ही एक सामुहिक कला आहे. त्यातून व्यक्तिरेखा सादरीकरण केले जाते. नाटक सामुहिक कला असल्याने एकमेकांना मदत करून सांघिक भावना तयार होते. संस्थेच्या वतीने शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांमधील कला गुणांचा विकास करण्यासाठी पुरोहित एकांकिका स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. हा उपक्रम स्तुत्य असून प्रेरणादायी आहे असे भाटे यांनी सांगितले.पुरोहित एकांकिका स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक होते. प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, खजिनदार वैशाली गोसावी स्पर्धा प्रमुख सुधीर फडके, ऋषिकेश पुरोहित परीक्षक हरीश जाधव, रेश्मा काळोखे, निर्मला अष्टपुत्रे, पल्लवी ओढेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अध्यक्षपदावरून महेश दाबक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी केले.सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा पुरस्कार इगतपुरी येथील महात्मा गांधी विद्यालयाने सादर केलेल्या ‘आम्हाला पण शाळा हवी’ या एकांकिकेला मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार कृष्णा राजपूत, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- विजय कुमावत, सर्वोत्कृष्ट नेपथ्य- अशोक इंपाळ, सर्वोत्कृष्ट एकांकिका लेखन पुरस्कार- माधवी पंडित आदींना पाहुण्याच्या हस्ते ढाल, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.पाहुण्याचा परिचय वैशाली गोसावी यांनी करून दिला. परीक्षकांचा परिचय हेमंत देशपांडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्राची सराफ व कामिनी पवार यांनी केले. आभार सुधीर फडके यांनी मानले. कार्यक्र मास संकुल प्रमुख वसंत जोशी, शाळा समिती अध्यक्ष जयंत मोंढे, प्राचार्य प्र. ला. ठोके, अ. रा. गायकवाड, दि. न. वाणी, गोरक्ष बागुल, संजीवनी धामणे, ज्योती मोदियानी, डॉ लीना पांढरे आदिंसह संस्था, शाळांचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.२७ एकांकिका झाल्या सादरपुरोहित एकांकिका स्पर्धेत शहरी व ग्रामीण भागातून एकूण २७ एकांकिका सादर झाल्या. त्यातून अंतिम स्पर्धेसाठी प्राथमिक विभागात (स्वप्नांना पंख नवे) प्राथमिक विद्यामंदिर सरदवाडी, सिन्नर, (आम्हाला पण शाळा हवी) माध्यमिक शहरी गट- इगतपुरी येथील महात्मा गांधी विद्यालय, (कर्तव्य) माध्यमिक ग्रामीण गटात नांदगाव तालुक्यातील वाखारी येथील किसान माध्यमिक विद्यालय, (पण थोडा उशीर झाला) महाविद्यालयीन गटात सिन्नर येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयाचे आरंभ महाविद्यालय यांच्या चार एकांकिका सादर झाल्या होत्या.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक