शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

समृद्धी महामार्गप्रश्नी दुशिंगपूरच्या शेतकऱ्यांनी उपोषण थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 9:35 PM

दुशिंगपूर येथील बंधाºयातून समृद्धी महामार्ग जाणार असल्याने कमी होणारी साठवण क्षमता पूर्ववत करण्यासाठी खोदकामाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अधिकचे खोदकाम करून बंधाºयांची क्षमता ६७ एमसीएफटीपर्यंत वाढवावी, अशी सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रशासनास केली. त्यानंतर समृद्धी महामार्गाशी संबंधित आपल्या विविध मागण्यांसाठी दुशिंगपूर बंधाºयात उपोषणास बसलेले सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, कचरू कहांडळ यांची समजूत काढत आमदार कोकाटे यांनी त्यांचे उपोषण थांबवले.

ठळक मुद्देआमदारांची मध्यस्थी : बंधाºयाची साठवण क्षमता वाढणार

सिन्नर : तालुक्यातील मोठा साठवण तलाव असणाºया दुशिंगपूर येथील बंधाºयातून समृद्धी महामार्ग जाणार असल्याने कमी होणारी साठवण क्षमता पूर्ववत करण्यासाठी खोदकामाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अधिकचे खोदकाम करून बंधाºयांची क्षमता ६७ एमसीएफटीपर्यंत वाढवावी, अशी सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रशासनास केली. त्यानंतर समृद्धी महामार्गाशी संबंधित आपल्या विविध मागण्यांसाठी दुशिंगपूर बंधाºयात उपोषणास बसलेले सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, कचरू कहांडळ यांची समजूत काढत आमदार कोकाटे यांनी त्यांचे उपोषण थांबवले.तहसीलदार राहुल कोताडे, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता डी. के. देसाई, उपअभियंता बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते. समृद्धी महामार्गाचे काम लॉकडाऊन काळात देखील सुरू आहे. समृद्धीच्या माध्यमातून दुशिंगपूर च्या तलावाचे खोलीकरण होणार असेल ते त्याचा दूरगामी फायदा होणार आहे. आज तलावात २० एमसीएफटी पाणी साठणे अवघड आहे. तलावात ६७ एमसीएफटी एवढे पूर्ण क्षमतेने पाणी साठवण्यासाठी देवनदी पूरचारी योजना फलदायी ठरेल, असा सल्ला त्यांनी दिला. शिंदे व कहांडळ यांच्या प्रश्नांवर लॉकडाऊन संपल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा घडवून आणली जाईल असे ते म्हणाले. कोकाटे यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन उपोषण थांबविले. माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, विजय काटे, विजय सोमाणी, कानिफनाथ काळे, संजय कहांडळ, अशोक घेगडलमल, विठ्ठलराव उगले आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी