येवला : राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या संपात येवला तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना, मुख्याध्यापक संघटना यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बुधवारी (दि.८) माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर संघटना प्रतिनिधींनी येवला तहसील कार्यालयात ठिय्या देऊन मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी, तहसीलदारांना दिले.संप यशस्वी करण्यासाठी गुरुवारीही सर्वांनी शाळा बंद ठेऊन संपात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.याप्रसंगी मुख्याध्यापक संघटनेचे राज्य प्रतिनिधी माणिकराव मढवई, आण्णासाहेब काटे, जी. एस. येवले, नवनाथ शिंदे, सविता सौंदाणे, टीडीएफ तालुकाध्यक्ष शिवाजी भालेराव, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दत्तकुमार उटवाळे, पोपट बारे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी पंडित मढवई, कानिफ मढवई, ए. व्ही. पैठणकर, दत्तात्रय गाडेकर, एस. पी. पवार आदी उपस्थित होते.नांदगावी तहसीलदारांना निवेदननांदगाव : माध्यमिक शिक्षक संघ, टीडीएफ व शिक्षकेतर संघटना व समन्वय समितीच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर अंदोलन करण्यात येऊन नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर अरुण पवार, टी. एम. डोंगरे, अशोक कदम, नरेंद्र ठाकरे, रमेश घोडके, जयवंत भाबड, प्राथमिक संघटनेचे हेमंत पवार यांनी भूमिका मांडली. सदर आंदोलनासाठी विविध शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येवला, नांदगावी शिक्षक, शिक्षकेतर संघटनेतर्फे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:50 IST
येवला : राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या संपात येवला तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना, मुख्याध्यापक संघटना यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बुधवारी (दि.८) माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर संघटना प्रतिनिधींनी येवला तहसील कार्यालयात ठिय्या देऊन मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी, तहसीलदारांना दिले. संप यशस्वी करण्यासाठी गुरुवारीही सर्वांनी शाळा बंद ठेऊन संपात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
येवला, नांदगावी शिक्षक, शिक्षकेतर संघटनेतर्फे निवेदन
ठळक मुद्देयेवला तहसील कार्यालयात ठिय्या देऊन मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी, तहसीलदारांना दिले.