मांजरपाड्यासाठी ‘जलहक्क’तर्फे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:47 IST2020-02-05T22:33:47+5:302020-02-06T00:47:53+5:30
मांजरपाडा योजनेच्या माध्यमातून तालुक्याला पाणी आणून दुष्काळी स्थिती कायमची दूर करता येऊ शकेल यासाठी नांदगाव तालुका जलहक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव मांडला.

मनमाड येथे जलहक्क समितीच्या वतीने आमदार सुहास कांदे यांना निवेदन देताना निवृत्ती खालकर, अशोक परदेशी, नानासाहेब आहेर, विशाल वडघुले, मच्छिंद्र वाघ आदी.
मनमाड : मांजरपाडा योजनेच्या माध्यमातून तालुक्याला पाणी आणून दुष्काळी स्थिती कायमची दूर करता येऊ शकेल यासाठी नांदगाव तालुका जलहक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव मांडला.
मांजरपाडा-१ च्या कालव्याचे रुंदीकरण, खोलीकरण, अस्तरीकरण केल्यास वहनक्षमता वाढून ते पाणी येवल्याबरोबरच नांदगाव तालुक्यालाही मिळू शकते. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही सकारात्मकता दाखविलेली असल्याने कमी खर्चात व अल्पकाळात निंबाळा ते रायपूर -वागदर्डी आणि तेथून नांदगाव तालुक्याला उताराने पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती तालुका जलहक्क समितीने बैठकीत मांडली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जलहक्क समितीचे कार्यकर्ते निवृत्ती खालकर, विशाल वडघुले, योगेश सोनार रामदास पगारे, युनूस पठाण, रमेश खरे, अरुण पवार , मच्छिंद्र वाघ, समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांनी सहभाग घेतला.