टॅँकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 18:04 IST2018-08-08T18:03:46+5:302018-08-08T18:04:02+5:30
सिन्नर : तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने एैन पावसाळ्यातही पाणी पुरवठ्याची स्थिती वाईट आहे. त्यामुळे टँकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे केली आहे.

टॅँकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावे
सिन्नर : तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने एैन पावसाळ्यातही पाणी पुरवठ्याची स्थिती वाईट आहे. त्यामुळे टँकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे केली आहे.
यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, अवधूत आव्हाड उपस्थित होते. बैठकीत पाणी टंचाईवर चर्चा करण्यात आली.
तालुक्यातील टंचाईग्रस्त गावे व वाड्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव येताच त्याची तातडीने पाहणी होवून उपविभागीय अधिकाऱ्यांकडून आलेल्या अहवालानंतर लगेचच टँकर सुरु करणे गरजेचे असल्याचे आमदार वाजे यांनी खेडकर यांना सांगितले. दोडी खुर्द येथील रामोशीवाडी, आव्हाड वस्ती, खंबाळे येथील पिंपळाचा मळा, भालेराव वस्ती, भाबड व वाकचौरे वस्ती, डावरे, टेकाडे, गोफणे वस्तीवर टँकर सुरु करण्याचे लेखी आदेश खेडकर यांनी दिले. शासकीय टँकर पुरेसे नसल्यास खासगी टँकरचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
चौकट- टॅँकरने पाणीपुरवठा
तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्याने भर पावसाळ्यातही ९ गावे ४१ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तीन शासकीय तर सात खासगी टँकरद्वारे ४१ फेºयांतून सुमारे पाच लाख लीटर पाणी पुरवठा केला जात असून पाऊस न झाल्यास टंचाई स्थिती वाढत जाण्याची चिन्हे आहेत.