निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 20:01 IST2019-06-28T20:01:31+5:302019-06-28T20:01:48+5:30
महिला व बाल कल्याण विभागाकडून ग्रामीण भागातील मुलींना संगणक एमएससीआयटी प्रशिक्षण देण्याची योजना राबविली जात असून, त्यासाठी किती प्रस्ताव दाखल झाले याचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी बºयाच प्रकल्पांनी अद्याप लाभार्थ्यांचा प्रस्तावच सादर केलेले नसल्याचे स्पष्ट झाले.

निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महिला व बाल कल्याण विभागामार्फत योजना राबविल्या जात असताना त्यासाठी लाभार्थी निश्चित करण्याचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वेळोवेळी दिलेल्या असतानाही प्रकल्प अधिका-यांकडून प्रस्ताव सादर करण्यात चालढकलपणा केला जात असल्याचे पाहून प्रस्ताव सादर न करणा-या अधिका-यांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महिला व बाल कल्याण सभापती अर्पणा खोसकर यांनी दिल्या आहेत.
शुक्रवारी महिला व बाल कल्याण समितीची मासिक सभा खोसकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात महिला व बाल कल्याण विभागाकडून ग्रामीण भागातील मुलींना संगणक एमएससीआयटी प्रशिक्षण देण्याची योजना राबविली जात असून, त्यासाठी किती प्रस्ताव दाखल झाले याचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ब-याच प्रकल्पांनी अद्याप लाभार्थ्यांचा प्रस्तावच सादर केलेले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे निधी खर्च न होता, अखर्चित राहतो. परिणामी विभागाची नाहक बदनामी होत असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली. त्याची दखल घेत ज्या प्रकल्पांनी लाभार्थी प्रस्ताव सादर केलेले नाहीत किंवा कमी केले आहेत, अशा बाल विकास प्रकल्प अधिका-यांच्या विरुद्ध प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना खोसकर यांनी दिल्या. त्याचप्रमाणे अंगणवाडी व शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्यांना पाचारण करण्यात यावे असे मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या सूचना असतानाही चांदवड तालुक्यात अंगणवाडी प्रवेशाच्या दिवशी बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिकांनी निमंत्रित केले नसल्याची तक्रार वडाळीभोई गटाच्या सदस्य कविता धाकराव यांनी बैठकीत केली. त्याची दखल घेऊन संबंधित पर्यवेक्षिका व बाल विकास प्रकल्प अधिकाºयांना मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या स्वाक्षरीने कारणे दाखवा नोटीस देण्याचे ठरविण्यात आले. लोकप्रतिनिधींचा अशा प्रकारे अपमान सहन केला जाणार नसल्याचेही खोसकर यांनी अधिकाºयांना सांगितले. या बैठकीस कविता धाकराव, रेखा पार, गणेश अहिरे, बाल विकास अधिकारी दत्तात्रय मुंडे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी रवींद्र चौधरी उपस्थित होते.