विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टतर्फे कार्यक्रम

By Admin | Updated: August 21, 2015 23:58 IST2015-08-21T23:57:52+5:302015-08-21T23:58:08+5:30

विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टतर्फे कार्यक्रम

Program by Vitthal Rukmai Temple Trust | विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टतर्फे कार्यक्रम

विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टतर्फे कार्यक्रम

नाशिक : कापडबाजारातील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टच्या वतीने दि. २७ आॅगस्टपर्यंत विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली आहे.
ट्रस्टच्या वतीने दि. २६ आॅगस्ट रोजी महिला भजन स्पर्धा दुपारी १२ ते ५ या वेळेत होणार असून त्यासाठी प्रवेशिका उपलब्ध करून दिल्या आहेत. दि. २२ आॅगस्टला पाककला कार्यशाळा होणार आहे. दि. २३ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ आॅगस्टला साडी ड्रेपिंग आणि मेकअप कार्यशाळा होईल. दि. २५ आॅगस्टला महिलांसाठी एक मिनिट स्पर्धा होणार असून दि. २७ आॅगस्ट रोजी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याशिवाय रोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत. तसेच दैनंदिन धार्मिक विधीही होणार आहे. या सर्व स्पर्धा व उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Program by Vitthal Rukmai Temple Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.