शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नाशिकमध्ये बाराव्या दिवशीही प्राध्यापकांच्या संप सुरूच ; परीक्षांना मात्र सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 16:27 IST

विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलने करू नही प्रश्न सुटत नसल्याने राज्यातील प्राध्यापकांनी दि. २५ सप्टेंबर पासून पुकारलेला संप अजूनही सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार प्राध्यापकांपैकी सुमारे पंधराशेहून अधिक प्राध्यापक पहिल्या दिवशी या संपात सहभागी झाले होते. परंतु, काही प्राध्यापकांनी स्थानिक संघटनांचा निर्णय घेऊन नियमित कामकाज सुरू केले असून, संपाच्या १२व्या दिवशी ३७५ शिक्षक संपात प्रत्यक्षरीत्या पूर्णवेळ सहभागी आहेत.

ठळक मुद्देप्राध्यपकांच्या संपाचा बारावा दिवसपरीक्षांना सहकार्य, 375 प्राध्यपकांचे पूर्णवेळ कामकाज बंद काही प्राध्यपकांकडून नियमित कामजास सरुवात

नाशिक : विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलने करू नही प्रश्न सुटत नसल्याने राज्यातील प्राध्यापकांनी दि. २५ सप्टेंबर पासून पुकारलेला संप अजूनही सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार प्राध्यापकांपैकी सुमारे पंधराशेहून अधिक प्राध्यापक पहिल्या दिवशी या संपात सहभागी झाले होते. परंतु, काही प्राध्यापकांनी स्थानिक संघटनांचा निर्णय घेऊन नियमित कामकाज सुरू केले असून, संपाच्या १२व्या दिवशी ३७५ शिक्षक संपात प्रत्यक्षरीत्या पूर्णवेळ सहभागी आहेत. संपात सहभागी असताना परीक्षचे कामकाज करणाºया शिक्षकांची संख्या साडेचारशे ते पाचशेपर्यंत असून, सध्या आठशेहून अधिक शिक्षक संपात सहभागी असले तरी संपाचा फारसा प्रभाव महाविद्यालयांमध्ये दिसून येत नसल्याचे काही प्राध्यापकांनी सांगितले आहे.महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेने दोन महिन्यांत तब्बल पाचवेळा राज्यस्तरीय आंदोलने करूनही प्राध्यापकांची एकही मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे प्राध्यापकांनी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतल्या असून, या संपाला १२ दिवस उलटले आहे. यापूर्वी प्राध्यापकांनी ६ आॅगस्टला काळ्या फिती लावून शिक्षक मागणी दिन पाळला होता. त्यानंतर २० आॅगस्टला उच्च शिक्षण सहसंचालक यांच्या विभागीय कार्यालयासमोर प्राध्यापक प्रतिनिधींनी उपस्थित राहून निदर्शने केली होती. परंतु त्यानंतरही प्राध्यापकांच्या मागण्यांची पूर्तता होऊ शकलेली नसल्याने प्राध्यापक महासंघाने कामबंद आंदोलन के ले आहे. या संपात विनाअनुदानित महाविद्यावलयांचे प्राध्यापक सहभागी नाहीत. त्याचप्रमाणे काही प्राध्यापकांनी सुरुवातीच्या तीन-चार दिवसांनंतर कामकाज सुरू केल्याने  प्रथम सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. सध्या परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने उर्वरित प्राध्यापकही परीक्षांना सहकार्य करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होत नसल्याचे महाविद्यालयांकडून सांगण्यात आले आहे.  काही प्राध्यापकांकडून कामकाज सुरू नाशिकमधील एचपीटी, आरवायके, बिटको, भोसला महाविद्यालयांसह नामपूर येथील महाविद्यालयाच्या प्राध्यापाकांनी संपात सुरुवातीपासूनच सहभाग घेतलेला नाही, तर केटीएचएम, व्ही. एन. नाईक, पंचवटी व देवलाळी कॅम्पच्या व सिडको या शहरातील महाविद्यालयासह ग्रामीण भागातील इगतपुरी, सिन्नर, निफाड, त्र्यंबकेश्वर, क ळवण, देवळा, सटाणा, मनमाड, नांदगाव, मालेगाव, ताराबाद, दिंडोरी, वणी, सुरगाणा, पिंपळगाव आदी महाविद्यालयांपैकी काही महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांनी सुरुवातीच्या तीन-चार दिवसांनंतर नियमित कामकाज सुरू केले आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकProfessorप्राध्यापकcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठStudentविद्यार्थी