तकतराव रथाची नैताळे गावात मिरवणुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 18:09 IST2021-01-28T18:08:36+5:302021-01-28T18:09:46+5:30
जळगाव नेऊर : भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मतोबा महाराज यात्रोत्सवात जऊळके (ता.येवला) येथील तकतराव रथाला मान दिला जातो. यावर्षी कोरोना नियमांचे पालन करत बुधवारी (दि.२७) रात्री १० वाजता रथाची जऊळके गावात मिरवणूक काढण्यात आली.

येवला तालुक्यातील जऊळके येथील तकतराव रथाची नैताळे गावात निघालेली मिरवणूक. प्रसंगी भाविकांची झालेली गर्दी.
जळगाव नेऊर : भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मतोबा महाराज यात्रोत्सवात जऊळके (ता.येवला) येथील तकतराव रथाला मान दिला जातो. यावर्षी कोरोना नियमांचे पालन करत बुधवारी (दि.२७) रात्री १० वाजता रथाची जऊळके गावात मिरवणूक काढण्यात आली.
येथील मतोबा महाराजांचे भक्त साहेबराव गवंडी यांना अनेक वर्षापासून रथ ओढण्याचा मान दिला जातो. रथ ओढण्यासाठी शामराव जाधव, भीमा भळसाने या शेतकऱ्यांच्या बैलांना मान मिळाला. यावेळी अनेक महिलांनी मतोबा महाराजांच्या रथाचे पूजन केले. भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सात धान्यापासुन बनविलेले धपाटे हे मतोबा महाराजांना नैवेद्य म्हणून दाखविले जाते. रात्री रथ मिरवणूकीनंतर १२ वाजता नैताळे गावाकडे प्रस्तान झाले व नैताळे येथे गुरुवारी (दि.२८) सायंकाळी ४ वाजता मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत रथ मिरवणूक झाली. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले