शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड करवसुलीत पलिकेला अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:47 IST

नाशिक : महापालिकेने मोकळ्या भूखंडावरील करवसुलीत वाढ केली असली तरी मुळातच २००६ पासून अशाप्रकारे धोरण ठरल्यानंतरही करवसुली करण्यात कर्मचाऱ्यांना अडचणीच येत आहेत. संबंधित भूखंडधारकाने स्वेच्छेने कर लावण्यासाठी अर्ज केल्यासच त्याची अंमलबजावणी केली जाते अन्यथा संबंधित भूखंडधारक ले-आउट किंवा पुनर्विकासासाठी गेल्यासच त्यावर लाखो रुपयांची मागणी नोंदवून अडवणूक केली जाते.

ठळक मुद्देकरआकारणी : मागणी केल्यासच लागू होतो करा

नाशिक : महापालिकेने मोकळ्या भूखंडावरील करवसुलीत वाढ केली असली तरी मुळातच २००६ पासून अशाप्रकारे धोरण ठरल्यानंतरही करवसुली करण्यात कर्मचाऱ्यांना अडचणीच येत आहेत. संबंधित भूखंडधारकाने स्वेच्छेने कर लावण्यासाठी अर्ज केल्यासच त्याची अंमलबजावणी केली जाते अन्यथा संबंधित भूखंडधारक ले-आउट किंवा पुनर्विकासासाठी गेल्यासच त्यावर लाखो रुपयांची मागणी नोंदवून अडवणूक केली जाते.मोकळ्या भूखंडावरील करआकारणीस २००६ मध्ये प्रारंभ झाला. त्यावेळी महापालिकेने धोरण ठरविले असून, त्यानुसार लेआउट म्हणजे अभिन्यास मंजूर असणाºयांनाच कर लागू केला जातो. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्च महिन्यात काढलेल्या अधिसूचनेत मोकळ्या भूखंडांचा समावेश केला असला तरी आजवर अशाप्रकारे मोकळ्या भूखंडांवर कर लागू असूनही तो वसूल करण्यात कर्मचाºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. एखाद्या इमारतीला आणिभूखंड करवसुलीत पालिकेला अडचण(पान १ वरून)भूखंडाला कर लागू करणे आणि वसुली करणे यात मोठा फरक आहे. शहरातील मोकळे भूखंड कोणाचे आणि त्याचे मालक कोण? याची माहिती मनपाला नसते. त्याचा अभिन्यास मंजुरीसाठी आल्यानंतर त्याचवेळी माहिती मिळते. अन्यथा सातबारा कोणाच्या नावे आहे याचीदेखील माहिती मिळत नाही. संबंधितांनी मनपाकडे कर आकारणीसाठी अर्ज केला तर मग भूखंडाचे मूल्यमापन करून माहिती घेतली जाते अन्यथा ज्यावेळी संबंधित भूखंडाचा विकास करायचा असेल आणि त्यासाठी जागामालक महापालिकेकडे येतो, त्याचवेळी त्याला कमिंसमेंट प्रमाणपत्र देण्याच्या आत थकबाकी वसूल करण्याची सक्ती केली जाते. त्यामुळे आताही आयुक्तांनी मोकळ्या भूखंडांवर कर लागू केला असला तरी वसुली करणे मात्र कर्मचाºयांच्या दृष्टीने अडचणीचे ठरले आहे. आयुक्तांनी मोकळ्या भूखंडांवर कर लागू केला असला तरी वसुली करणे मात्र कर्मचाºयांच्या दृष्टीने अडचणीचे ठरले आहे. ...तर सातबारावर बोजामहापालिकेच्या वतीने कोणत्या एखाद्या भूखंडावर अगदी कर लावण्याचे ठरवलेच तर मग त्यासाठी सातबारावर बोजा चढविला जातो. या पलीकडे मात्र महापालिकेकडे कोणत्याही प्रकारे भूखंडावरील कर संकलनाची व्यवस्था नाही.मोकळ्या भूखंडावर करवसुलीसाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी उत्पन्नवाढ हा मुद्दा प्रशासन पुढे करते. परंतु जी नियमित कर लागू करण्याची व्यवस्था आहे तीदेखील सोपी असून, त्यावर अंमल होत नाही.

एखाद्या इमारतीच्या बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्वाचा दाखला घरपट्टी विभागाकडे जातो. वास्तुविशारद कार्पेट प्रमाणपत्र दिले जाते. परंतु त्यानंतरही मिळकतधारकाकडे प्लॅनपासून सर्वच कागदे पुन्हा मागितली जातात. त्यात तरी सुधारणा करावी. - अरुण काबरे, वास्तुविशारद