सटाणा इनरव्हील क्लबतर्फे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:18 IST2021-01-11T20:29:17+5:302021-01-12T01:18:40+5:30
सटाणा : इनरव्हिल डेनिमित्त इनरव्हील क्लब ऑफ सटाणा मिडटाउनमार्फत ह्यइनरव्हिल कट्ट्याचेह्ण उद्घाटन शोभा येवला यांच्या हस्ते करण्यात आले. क्लबमार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आली.

सटाणा इनरव्हील क्लबतर्फे बक्षीस वितरण
इनरव्हील क्लब ऑफ सटाणा मिडटाउनच्या कट्ट्यावर पहिला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. सर्व सहभागी सभासदांनी डान्स, गायन, भजन, लेख अभिवाचन, ॲक्टिंग यांचे सादरीकरण केले. इनरव्हील फाउंडर मार्गारेट गोल्डिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक अध्यक्ष रूपाली जाधव यांनी करून सुरुवातीला भंडारा येथील मृत्युमुखी झालेल्या चिमुरड्याना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात सहभागी सर्व सभासदांना इनरव्हील लोगो असणारे सॅश, तसेच क्राउन घालून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी चार्टर प्रेसिडेंट रूपाली कोठावदे, स्मिता येवला, साधना पाटील, नयना कोठावदे, पूनम अंधारे, रेखा वाघ, मीनाक्षी जाधव, रूपाली पंडित, रूपाली निकुंभ, रंजिता मोरे, सुजाता पाठक, कल्पना जाधव, पुष्पा जाधव उपस्थित होत्या.