बँकांचे खासगीकरण; विरोधात स्वाक्षरी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 00:58 IST2020-09-14T00:58:21+5:302020-09-14T00:58:49+5:30
बँकेच्या खासगीकरण विरोधात बँक असोसिएशनच्या वतीने देशभर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात सुरू करण्यात आली असून, रविवारी ( दि.१३) त्याची सुरुवात नाशिकमध्ये करण्यात आली आहे.

बॅँकांच्या खासगीकरणाविरोधात स्वाक्षरी मोहीमेप्रसंगी शपथ घेताना बॅँकेचे अधिकारी व कर्मचारी.
नाशिक : बँकेच्या खासगीकरण विरोधात बँक असोसिएशनच्या वतीने देशभर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात सुरू करण्यात आली असून, रविवारी ( दि.१३) त्याची सुरुवात नाशिकमध्ये करण्यात आली आहे.
आॅल इंडिया बँक आॅफ महाराष्ट्र एम्प्लॉइज फेडरेशन व आॅल इंडिया बँक आॅफ महाराष्ट्र आॅफिसर्स ंअसोसिएशन यांच्यातर्फे बँक खासगीकरणाच्या विरोधात संघटनात्मक कार्यक्रम जाहीर केला आहे आणि त्यानुसार दिनांक १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान संपूर्ण भारत देशामध्ये या प्रस्तावित खासगीकरणाच्या धोरणाविरोधात बँकेचे ग्राहक, हितचिंतक, सामाजिक संस्था यांच्याकडून स्वाक्षरीची मोहीम सुरूकरण्यात आली आहे. या सप्ताहातील मोहिमेचा प्रथम भाग म्हणून रविवारी संपूर्ण भारतातील प्रत्येक जिल्हानिहाय व बँकेच्या विभागनिहाय कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता शपथ ग्रहण कार्यक्रम करण्यात आला आला. बँक खासगीकरणाच्या विरोधात लढा सुरू करण्याची ही मोहीम आहे.
या आंदोलनात गिरीश धनक, गिरीश जहागीरदार, राजन लोंढे, आदित्य तुपे, किसनराव देशमुख, मनोज जाधव, विजय गायकवाड, विनोद मोझे, यश कापसे, मंगेश रोकडे, अनघा देवधर, माया पाठराव, वर्षा खोपकर आदी उपस्थित होते.