पलंगावरून पडल्याने बंदीवानाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 01:52 IST2022-05-06T01:52:21+5:302022-05-06T01:52:40+5:30
नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा वृद्ध बंदी ज्ञानदेव गोपीनाथ पवार (७७) हे रात्री झोपेत पलंगावरून तोल जाऊन खाली जमिनीवर कोसळले.

पलंगावरून पडल्याने बंदीवानाचा मृत्यू
नाशिक रोड : येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा वृद्ध बंदी ज्ञानदेव गोपीनाथ पवार (७७) हे रात्री झोपेत पलंगावरून तोल जाऊन खाली जमिनीवर कोसळले. यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. ही घटना गुरुवारी (दि. २८) घडली. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.