कारागृह प्रशासनाची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:50 IST2020-08-13T22:47:16+5:302020-08-13T23:50:46+5:30

नाशिकरोड : औरंगाबादचे कारागृह पोलीस उपमहानिरीक्षक दिलीप झळके यांनी बुधवारी सकाळी जेलरोड येथील नाशिक मध्यवर्ती कारागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी सुरक्षा, शिस्त आदीची माहिती घेऊन विविध सूचना केल्या. राज्यात व देशातील अनेक कारागृहांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असतानाही नाशिकरोड कारागृहाचेदेखील काही बंदिवानांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यादृष्टीने खबरदारी घेण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. झळके म्हणाले, कारागृहासाठी वेगळे लॉकडाऊन आहे. त्याचे तसेच नियमांचे कसोशीने पालन करण्यात आले. सर्वांनी योग्य ती दक्षता घेतली.

Prison administration review meeting | कारागृह प्रशासनाची आढावा बैठक

कारागृह प्रशासनाची आढावा बैठक

ठळक मुद्दे नियमांचे कसोशीने पालन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : औरंगाबादचे कारागृह पोलीस उपमहानिरीक्षक दिलीप झळके यांनी बुधवारी सकाळी जेलरोड येथील नाशिक मध्यवर्ती कारागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी सुरक्षा, शिस्त आदीची माहिती घेऊन विविध सूचना केल्या. राज्यात व देशातील अनेक कारागृहांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असतानाही नाशिकरोड कारागृहाचेदेखील काही बंदिवानांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यादृष्टीने खबरदारी घेण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
झळके म्हणाले, कारागृहासाठी वेगळे लॉकडाऊन आहे. त्याचे तसेच नियमांचे कसोशीने पालन करण्यात आले. सर्वांनी योग्य ती दक्षता घेतली. बंदिवानांना शाळेतील तात्पुरत्या कारागृहात ठेवले जाते. त्यांची कोरोना चाचणी करूनच मुख्य कारागृहात प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळेच येथे कर्मचारी, बंदी यांना कोरोनाची लागण झालेली नाही. तसेच सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करून विविध सूचना
केल्या.
यावेळी कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी कारागृहातील सध्याच्या कामकाजाची माहिती दिली. बैठकीला कारागृह वरिष्ठ निरीक्षक अशोक कारकर, कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम, तुरु ंगाधिकारी बाबर, सतीश गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Prison administration review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.