एकलहरातील जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:30 IST2018-08-21T00:29:44+5:302018-08-21T00:30:02+5:30

एकलहरारोडवरील रेल्वे रुळाच्या बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रविवारी (दि़१९) दुपारी नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकला़

Printed at a gambling spot | एकलहरातील जुगार अड्ड्यावर छापा

एकलहरातील जुगार अड्ड्यावर छापा

नाशिकरोड : एकलहरारोडवरील रेल्वे रुळाच्या बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रविवारी (दि़१९) दुपारी नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या नऊ जुगाºयांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़
अरिंगळे मळा येथील रेल्वे रुळाच्या बाजूला जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार दुपारी अडीच वाजेच्या सुमारास छापा टाकला असता संशयित प्रकाश बागुल (रा. आनंदनगर), संजय बर्वे (रा. अरिंगळे मळा), महेंद्र सोनवणे (रा. त्रिमूर्तीनगर), विठ्ठल हुच्चे
(रा. अरिंगळे मळा), आप्पा झारखंडे (रा. ओढा रोड), आकाश गिरजे,  (रा. अरिंगळे मळा), रामराव जाधव, ( रा. अरिंगळे मळा), महेश अहिरे
(रा. गवळीवाडा), मंगेश इंगळे ,  (रा. अरिंगळे मळा) हे पत्यावर अंदर-बाहर जुगार खेळत होते़  पोलिसांनी या संशयितांकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई समाधान वाजे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Printed at a gambling spot