सटाणा : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील पुलाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून पावणे दोन लाख रु पयांचा ऐवज जप्त केला. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून दोन फरार आहेत. सटाणा-मालेगाव रस्त्यावरील ब्राम्हणगावनजीक मन्सापुरी नाल्याच्या पुलाखाली पूर्वेकडून एक नंबरच्या मोरीत आठ ते दहा जण राजरोस जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मंगळवारी दुपारी छापा टाकून जुगाराचे साहित्य, तीन मोटारसायकली, तीन मोबाइल , ३४०० रु पयांची रोकड असा पावणेदोन लाख रु पयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या छाप्यात जुगार खेळणाऱ्या संतोष दिलीप ठाकरे, बापू रघुनाथ सूर्यवंशी, कारभारी रेवजी सोनवणे, दादाजी चिंधा पानपाटील, संजय लक्ष्मण नवरे यांना पोलिसांनी अटक केली असून, भाऊसाहेब सीताराम कुमावत, अरु ण नानाजी पवार हे मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. सटाणा पोलिसांनी त्यांच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.
सटाण्यात जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:35 IST