पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात आगमन; मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत

By अझहर शेख | Updated: January 12, 2024 11:28 IST2024-01-12T11:27:48+5:302024-01-12T11:28:25+5:30

नरेंद्र मोदी हे  रोड शो आणि 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी तपोवन मैदानाकडे रवाना झाले आहे.

Prime Minister Narendra Modis arrival in Maharashtra Chief Minister welcomed | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात आगमन; मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात आगमन; मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत

नाशिक : 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निलगिरी बाग येथील हेलिपॅडवर आगमन झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन पंतप्रधान महोदयांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त (नाशिक शहर) संदीप कर्णिक उपस्थित होते.

यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे  रोड शो आणि 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी तपोवन मैदानाकडे रवाना झाले आहे.
 

Web Title: Prime Minister Narendra Modis arrival in Maharashtra Chief Minister welcomed