कांद्याला १५०० रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 00:12 IST2021-05-04T00:11:36+5:302021-05-04T00:12:02+5:30
अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात सोमवारी (दि.३) ५४१ वाहनातून अंदाजे १२,००० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होऊन कमाल भाव १५०० रुपये, किमान भाव २०० रुपये तर सरासरी ११५० ते १२५० रुपये भाव मिळाला.

कांद्याला १५०० रुपये भाव
ठळक मुद्देभाव स्थिर : अभोण्यात आवक वाढली
अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात सोमवारी (दि.३) ५४१ वाहनातून अंदाजे १२,००० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होऊन कमाल भाव १५०० रुपये, किमान भाव २०० रुपये तर सरासरी ११५० ते १२५० रुपये भाव मिळाला.
कोरोनाच्या महामारीने मागील वर्षी शेतकऱ्यांना कांदा ३०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल दराने विकावा लागला होता. त्यातून उत्पादन खर्च तर निघाला तर नाहीच उलट शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. मात्र यंदा सुरुवातीपासूनच चार अंकी दर मिळू लागल्याने बळीराजा काहीसा सुखावला असून भाववाढीची अपेक्षा बाळगून आहे.