सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले! सिलिंडरच्या दराची हजारी; महिलांची आता सरपणासाठी वारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 02:02 PM2022-05-19T14:02:45+5:302022-05-19T14:09:26+5:30

वटार (मनोज बागुल) - गॅस सिलिंडरचे दर हजारावर भिडल्याने ग्रामीण भागासह आदिवासी भागातील गोरगरीब मध्यमवर्गीयांना गॅसवर स्वयंपाक करणे आता ...

Price hike in LPG results in poor people from rural areas switching back to traditional sources of fuel | सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले! सिलिंडरच्या दराची हजारी; महिलांची आता सरपणासाठी वारी

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले! सिलिंडरच्या दराची हजारी; महिलांची आता सरपणासाठी वारी

googlenewsNext

वटार (मनोज बागुल) - गॅस सिलिंडरचे दर हजारावर भिडल्याने ग्रामीण भागासह आदिवासी भागातील गोरगरीब मध्यमवर्गीयांना गॅसवर स्वयंपाक करणे आता परवडणारे राहिलेले नाही. सिलिंडर बाजूला ठेवून महिला चूल पेटवण्यासाठी गरज भासणाऱ्या सरपणासाठी जंगलात भटकंती करत आहे. डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन लाकडाची साठवणूक करुन जास्तीत जास्त लाकूड चूल पेटविण्यासाठी पुरतील हे पाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

सबसिडीही बंद हुई गयी

‘‘भाऊ सिलिंडर महाग हुई गये , एवढा पैसा कुठून आणाना व सबसिडीही बंद हुई गयी ’’

यापेक्षा आपली लाकूडवरली चूल चांगली असे म्हणण्याची वेळ गोरगरीब महिलांवर आली आहे. सद्य स्थितीत कुटुंबाचा स्वयंपाक करण्यासाठी सिलिंडर परवडत नसल्याने व सबसिडीही मिळत नसल्याने रानावनात भटकंती करून लाकडाच्या काड्या गोळा करून मोळी तयार करुन डोक्यावर घेऊन पायपीट करावी लागते. ग्रामीण व आदिवासी भागात गोरगरीब महिलांना धुरापासून मुक्ती मिळावी यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गाजावाजा केला. घराघरात गॅस सिलिंडर पोहच केले. गॅस भरण्याच्या दरात मोठी वाढ झाली व सबसिडीपण नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडत नसल्याने ग्रामीण भागात महिला चुलीकडे वळाल्या आहे.

महिनाभरातच सिलिंडरचा दर १०४० रुपयांपर्यंत पोहचल्याने एवढी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. मोलमजुरी करून हा गॅस परवडत नसल्याने महिलांनी चुलीकडे मोर्चा वळवला आहे

शासनाने उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत मोफत सिलिंडर दिले मात्र गॅसचे भाव सुमारे १०४० रुपयांपर्यंत गगनाला भिडल्याने व सबसिडीपण नाही. मोलमजुरी करणाऱ्यांना हे परवडणारे नाही. त्यामुळे रानावनात भटकंती करून डोक्यावर सरपण आणून चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे.

- दसुबाई सोनवणे, गृहिणी, वटार

 

Web Title: Price hike in LPG results in poor people from rural areas switching back to traditional sources of fuel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.