शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

आधी लगीन नगरपालिकांचे नंतर पदवीधरचे

By admin | Updated: November 17, 2016 22:12 IST

पदवीधर निवडणूक हालचाली : २७ नोव्हेंबरनंतर येणार वेग

नाशिक : आधीच पुढे ढकलल्या गेलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला आता नगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे ब्रेक लागल्याचे चित्र आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ‘आधी लगीन कोंढाण्याचे नंतर रायबाचे’ या उक्तीनुसार आधी नगरपालिका निवडणुका मगच पदवीधरच्या निवडणुका असा मानस ठरविला आहे.साधारणत: दोन महिन्यांपूर्वीच भाजपाने उमेदवार जाहीर करून पदवीधर निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीवर कुरघोडी केली होती. अर्थात कॉँग्रेसनेही विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी जाहीर करून आपले इरादे स्पष्ट केले होते. दरम्यानच्या काळात दिवाळीपूर्वीच कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मुंबईला बैठका होऊनही आघाडीबाबत निर्णय होऊ शकला नाही. दरम्यानच्या काळात संबंधित उमेदवारांनी दिवाळीमध्ये शुभेच्छा व भेटवस्तू देत मतदारांना सूचक आवाहनही केले होते. मात्र २७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांनी पदवीधर ऐवजी नगरपालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच पदवीधरच्या उमेदवारांन वैयक्तिक पातळीवर प्रचाराची मुभाही दिल्याचे समजते. नाशिक पदवीधर मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या खूपच मोठा असल्याने उमेदवारांना आयताच प्रचारासाठी वेळ मिळाला आहे. दिवाळीच्या काळात उमेदवारांनी पाचही जिल्ह्यांत फिरून पहिला राऊंड पूर्ण केल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)