शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक आता नियमानुसारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 8:13 PM

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत असताना युती सरकारने पक्षांतर्गत गटबाजी व राजी-नाराजी टाळण्यासाठी विद्यमान पदाधिकाºयांना १२० दिवस म्हणजे चार महिन्यांची मुदतवाढ दिली होती.

ठळक मुद्देग्रामविकास विभागाचे सुधारित आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची चार महिन्यांची मुदतवाढ २० डिसेंबर रोजी संपत असल्याने नवीन अध्यक्ष, पदाधिकारी व विषय समित्यांच्या सभापतींची निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यात यावी असे घाईघाईने पत्र काढणाऱ्या ग्रामविकास विभागामुळे जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची धावपळ उडलेली असताना अवघ्या काही तासातच चूक उमगलेल्या ग्रामविकास विभागाने पुन्हा दुसरे पत्र काढून निवडणूक प्रक्रिया कायदेशीर मार्गानेच व नोटीस काढूनच पार पाडावी, असे आदेश दिले आहेत. ग्रामविकास विभागाच्या या नवीन पत्रामुळे २१ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची अटकळ आता लांबणीवर पडली असून, साधारण महिन्याच्या अखेरीस किंवा नवीन वर्षात होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत असताना युती सरकारने पक्षांतर्गत गटबाजी व राजी-नाराजी टाळण्यासाठी विद्यमान पदाधिकाºयांना १२० दिवस म्हणजे चार महिन्यांची मुदतवाढ दिली होती. सप्टेंबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात शासनाच्या या मुदतवाढीच्या आदेशाचा कागद प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या हातात पडला असला तरी, युती सरकारने २३ आॅगस्ट रोजीच हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आॅगस्ट महिन्यापासूनच चार महिन्यांचा कालावधी मोजण्यात आला. त्यानुसार येत्या दि. २० डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकारी व विषय समित्यांचे सभापती, पंचायत समित्यांचे सभापतींची मुदत संपुष्टात येत असल्याचे पत्र राज्याच्या ग्रामविकास विभागाने मंगळवारी (दि. १०) रोजी जारी केले. सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना अग्रेषित केलेल्या या पत्रात विद्यमान पदाधिकाºयांचा मुदतवाढीचा कालावधी दि. २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असून, त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे नमूद करण्यात आले होते. ग्रामविकास विभागाने पदाधिकाºयांची मुदत संपुष्टात येत असल्याचे कळविले असले तरी, अध्यक्ष व पदाधिकाºयांच्या निवडीसाठी राबविण्यात येणाºया कायदेशीर प्रक्रियेसाठी पुरेसा कालावधी दिला नसल्याचे सदरच्या पत्राद्वारे स्पष्ट झाल्याने प्रशासन यंत्रणेची धावपळ उडाली होती. अध्यक्ष, पदाधिकाºयांच्या निवडणुकीसाठी किमान सात दिवस अगोदर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे क्रमप्राप्त असला तरी, ग्रामविकास विभागाच्या पत्रातून तसा कोणताही उलगडा होत नसल्याचे पाहून संभ्रम निर्माण झाला होता. या संदर्भात काही अधिकाºयांनी ग्रामविकास विभागाकडे विचारणा करून त्यातील कायदेशीर अडचणी निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर मात्र रात्री उशिरा पुन्हा ग्रामविकास विभागाने नव्याने सुधारित पत्र काढून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, पदाधिकाºयांची मुदत दि. २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असली तरी, त्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक ती सूचना (नोटीस) निर्गमित करून निवडणुकांबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदElectionनिवडणूक