शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाशकात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 7:33 PM

व्हीव्हीआयपी कॅन्वायद्वारे ते मुंबई-आग्रा महामार्गावरून थेट शासकिय विश्रामगृहात दाखल झाले. रामनाथ कोविंद हे शासकिय विश्रामगृहावर मुक्कामी थांबणार आहे.

ठळक मुद्देशासकिय विश्रामगृह परिसरात प्रवेश निषिध्द विश्रामगृहाचा संपुर्ण ताबा सुरक्षायंत्रणेने घेतला आहेकॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलला ‘प्रेसिडेन्ट कलर्स’ पुरस्काराने ते गुरूवारी सन्मानित करणार

नाशिक :  राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे बुधवारी (दि.९) सायंकाळी नाशिक शहरात मुक्कामी आले आहे. गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलला विशेष ध्वज प्रदान करत ‘प्रेसिडेन्ट कलर्स’ पुरस्काराने ते गुरूवारी (दि.१०) सन्मानित करणार आहे.ओझरच्या विमानतळावर रामनाथ कोविंद यांचे विमान बुधवारी सायंकाळी उतरले. तेथे विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, विशेष पालीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून व्हीव्हीआयपी कॅन्वायद्वारे ते मुंबई-आग्रा महामार्गावरून थेट शासकिय विश्रामगृहात दाखल झाले. रामनाथ कोविंद हे शासकिय विश्रामगृहावर मुक्कामी थांबणार आहे. त्यांच्या आगमनापुर्वीच मंगळवारी सकाळी या मार्गावर व्हीव्हीआयपी कॅन्वॉयची रंगीत तालीमदेखील घेण्यात आली. या संपुर्ण मार्गावर बॉम्ब शोधक-नाशक व विशेष गुन्हे श्वान पथकाकडून कसून तपासणीदेखील करण्यात आली. विश्रामगृहाचा संपुर्ण ताबा सुरक्षायंत्रणेने घेतला आहे. या परिसरात प्रवेश निषिध्द करण्यात आला आहे. गडकरी चौकाकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.गांधीनगरच्या कॅटस्च्या मैदानावर मुख्य सोेहळा पार पडणार आहे. त्यासाठी ते ‘व्हीव्हीआयपी कॅन्वॉय’ने शासकिय विश्रामगृहावरून उद्या सकाळी रवाना होतील. कॅटस्च्या मैदानावर एव्हिएशनच्या वैमानिकांचा गौरव करत त्यांना मार्गदर्शनपर संदेश रामनाथ कोविंद देतील. यावेळी एव्हिएशनच्या लष्करी बॅन्ड पथकाच्या धूनवर वैमानिकांची तुकडी संचलन करत तीनही सेनादलांचे प्रमुख  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाशकात आगमनरामनाथ कोविंद यांना मानवंदना देणार आहेत. तसेच आपल्या हवाई कसरतींच्या माध्यमातून कौशल्याचे दर्शनही घडविणार आहे. यासाठी मागील आठवडाभरापासून कॅटस्च्या जवानांकडून सराव केला जात आहे. चित्ता, चेतक, ध्रूव आणि रूद्र या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चित्तथरारक हवाई प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत. या प्रात्याक्षिकांमध्ये अत्याधुनिक लढाऊ रूद्र हेलिकॉप्टरचाही सहभाग असणार आहे. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदNashikनाशिकDefenceसंरक्षण विभागIndian Armyभारतीय जवान