राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाशकात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 19:39 IST2019-10-09T19:33:43+5:302019-10-09T19:39:02+5:30
व्हीव्हीआयपी कॅन्वायद्वारे ते मुंबई-आग्रा महामार्गावरून थेट शासकिय विश्रामगृहात दाखल झाले. रामनाथ कोविंद हे शासकिय विश्रामगृहावर मुक्कामी थांबणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाशकात आगमन
नाशिक : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे बुधवारी (दि.९) सायंकाळी नाशिक शहरात मुक्कामी आले आहे. गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलला विशेष ध्वज प्रदान करत ‘प्रेसिडेन्ट कलर्स’ पुरस्काराने ते गुरूवारी (दि.१०) सन्मानित करणार आहे.
ओझरच्या विमानतळावर रामनाथ कोविंद यांचे विमान बुधवारी सायंकाळी उतरले. तेथे विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, विशेष पालीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून व्हीव्हीआयपी कॅन्वायद्वारे ते मुंबई-आग्रा महामार्गावरून थेट शासकिय विश्रामगृहात दाखल झाले. रामनाथ कोविंद हे शासकिय विश्रामगृहावर मुक्कामी थांबणार आहे. त्यांच्या आगमनापुर्वीच मंगळवारी सकाळी या मार्गावर व्हीव्हीआयपी कॅन्वॉयची रंगीत तालीमदेखील घेण्यात आली. या संपुर्ण मार्गावर बॉम्ब शोधक-नाशक व विशेष गुन्हे श्वान पथकाकडून कसून तपासणीदेखील करण्यात आली. विश्रामगृहाचा संपुर्ण ताबा सुरक्षायंत्रणेने घेतला आहे. या परिसरात प्रवेश निषिध्द करण्यात आला आहे. गडकरी चौकाकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.
गांधीनगरच्या कॅटस्च्या मैदानावर मुख्य सोेहळा पार पडणार आहे. त्यासाठी ते ‘व्हीव्हीआयपी कॅन्वॉय’ने शासकिय विश्रामगृहावरून उद्या सकाळी रवाना होतील. कॅटस्च्या मैदानावर एव्हिएशनच्या वैमानिकांचा गौरव करत त्यांना मार्गदर्शनपर संदेश रामनाथ कोविंद देतील. यावेळी एव्हिएशनच्या लष्करी बॅन्ड पथकाच्या धूनवर वैमानिकांची तुकडी संचलन करत तीनही सेनादलांचे प्रमुख राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाशकात आगमनरामनाथ कोविंद यांना मानवंदना देणार आहेत. तसेच आपल्या हवाई कसरतींच्या माध्यमातून कौशल्याचे दर्शनही घडविणार आहे. यासाठी मागील आठवडाभरापासून कॅटस्च्या जवानांकडून सराव केला जात आहे. चित्ता, चेतक, ध्रूव आणि रूद्र या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चित्तथरारक हवाई प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत. या प्रात्याक्षिकांमध्ये अत्याधुनिक लढाऊ रूद्र हेलिकॉप्टरचाही सहभाग असणार आहे.