नाशिक जिल्हा मजूर संघ अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:14 IST2018-10-11T23:05:30+5:302018-10-12T00:14:22+5:30
नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघ अध्यक्षपदी हरिभाऊ दत्तू वाघ, तर उपाध्यक्षपदी आशा संजय चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नाशिक जिल्हा मजूर संघ अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड बिनविरोध
नाशिक : नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघ अध्यक्षपदी हरिभाऊ दत्तू वाघ, तर उपाध्यक्षपदी आशा संजय चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष शिवाजी कासव, उपाध्यक्ष प्रमोद सुदाम भाबड यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर घेण्यात आलेल्या निवडणुकीत वाघ आणि चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा मजूर संघाच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी उपनिबंधक प्रेरणा शिवदास उपस्थित होत्या.