रासायनिक खतांचा होणारा बेसुमार वापर व त्यातून जमिनीची सुपीकता कमी होऊन शेतकरी बंधूंच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणासंबंधी जनजागृती व्हावी, यासाठी माती परीक्षणाचे सादरीकरण कृषिदूतांनी केले.
यावेळी आकाश शिंदे व ओंकार शिंदे या कृषिदूतांनी मार्गदर्शन केले. त्यांना उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुमार हाडोळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. परमेश्वरी पवार व प्रा. सुनील बैरागी यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी वसंत शिंदे, आनंदा शिंदे, दगू दाते, रघुनाथ शिंदे, किसन दाते, रंगनाथ काकड, विशाल शिंदे, रंगनाथ शिंदे, धनेश शिंदे, दीपक दाते, अमोल शिंदे व जळगाव परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.